सडकअर्जुनी(अनिल मुनिश्वर):-
=============================
तालुक्यातील सौंदड येथील लोहिया शिक्षण संस्था द्वारा संचालित रामेश्वरदास जमनादास लोहिया माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय ,रामदेवबाबा अध्यापक विद्यालय व जमुनादेवी लोहिया प्राथमिक , सौंदड यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यालयात दि.30एप्रिल 2025ला मा.जगदीश लोहिया ,संस्थापक – संस्थाध्यक्ष लो.शि.संस्था , सौंदड यांच्या अध्यक्षतेखाली भगवान परशुराम, थोर संत बसवेश्वर व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती यांची साजरी कऱण्यात आली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्या मा.उमा बाच्छल , मुख्याध्यापक मा.मनोज शिंदे, पर्यवेक्षक श्री.डी.एस.टेंभुर्णे, प्राध्यापक श्री.आर एन अग्रवाल उपस्थित होते.
यावेळी मा.अध्यक्ष व प्रमुख अतिथिंनी भगवान परशुराम, थोर संत बसवेश्वर व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख अतिथिंनी थोर संत महात्म्यांविषयी आपले मनोगत व्यक केले.
कार्यक्रमाला विद्यालयातील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन स.शिक्षक श्री. आर. आर. मोहतूरे यांनी केले तर आभार पर्यवेक्षक श्री. डी. एस.टेंभुर्णे यांनी केले.
