सडकअर्जुनी(अनिल मुनिश्वर):—————
येथील वनपरिक्षेत्र
अधिकारी कार्यालयातर्फे वृक्ष लागवड महाअभियानाचे आयोजन करून वनमहोत्सव”एक पेड मा के नाम”व माझी वसुंधरा अभियान अंतर्गत दि. ६ जुलै रोजी येथील क्रीडा संकुलात वृक्ष लागवड महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. वनपरिक्षेत्र अधिकारी मिथुन तरोने व सर्व कर्मचारी तर्फे आलेल्या पाहुण्यांचे स्वागत सर्वांना एक झाड, हरित पुष्पगुच्छ व वृक्ष देऊन करण्यात आले झाडे लावा झाडे जगवा हा संकल्प घेऊन वन महोत्सव विशेष प्रसंगी विविध प्रजातीचे वृक्ष सप्ताहाच्या निमित्ताने दिनांक १ ते ७ जुलै लागवड करण्यात आले.
यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष राजकुमार बडोले माजी मंत्री तथा आमदार अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्र, प्रमुख अतिथी म्हणून लायकराम भेंडारकर जिल्हा परिषद अध्यक्ष गोंदिया, दुग्गीपार पोलीस स्टेशन चे ठाणेदार गणेश वनारे, वनपरिक्षेत्र अधिकारी मिथुन तरोने, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल मूनिश्वर, अरविंद मेंढे,चंद्रमुनी बनसोड, मुन्ना ठाकुर, शाहिद पटेल व सडक अर्जुनी वनपरिक्षेत्रातील सर्व वनक्षेत्रपाल,वनरक्षक, वनमजूर व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते









