सडक अर्जुनी(अनिल मुनिश्वर):————
सौंदड येथील लोहिया शिक्षण संस्था द्वारा संचालित रामेश्वरदास जमनादास लोहिया माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,जमुनादेवी लोहिया प्राथमिक शाळा,सौंदड यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 23 जुन 2025 रोज सोमवारला विद्यालयात लोहिया शिक्षण संस्थेचे संस्थापक – संस्थाध्यक्ष मा. जगदीश लोहिया यांच्या अध्यक्षतेखाली विद्यालयात विद्यार्थी प्रवेश उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी लोहिया शिक्षण संस्थेचे सचिव मा. पंकज लोहिया, प्राचार्या मा.उमा बाच्छल, प्राचार्य मा. गुलाबचंद चिखलोंडे, मुख्याध्यापक मा.मनोज शिंदे , सौ. कल्पना काळे, प्राध्यापक आर. एन. अग्रवाल स. शि.डी. एस. टेभूर्ण यांच्या शुभहस्ते विद्यार्थांना पुष्पगुच्छ व नवीन पाठ्यपुस्तके देऊन आनंददायी पद्धतीने स्वागत करण्यात आले.
तसेच सर्व विद्यार्थ्यांना मिठाई देण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन शुभेच्छा दिल्या.यावेळी विद्यालयातील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स . शिक्षिका यु. बी. डोये यांनी केले तर आभार स. शिक्षक टी. बी. सातकर यांनी मानले.









