नरेश पुरुषोत्तम शिवणकर राज्यस्तरीय आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्काराने सन्मानित – मुंबई येथे ग्रामविकास मंत्री यांच्या हस्ते स्वीकारला पुरस्कार

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

मुंबई(अनिल मुनिश्वर):-(दि.27 मे 2025)
#########################
सन 2022-23 या वर्षात उत्कृष्ट कार्य करण्यासाठी राज्यस्तरीय आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्काराचे मानकरी ठरलेले राज्यातील भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यात कार्यरत असलेले ग्रामपंचायत अधिकारी नरेश पुरुषोत्तम शिवणकर यांचा आज 27 मे रोजी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित पंचायत राज पुरस्कार वितरण कार्यक्रमात ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
जिल्हा परिषद स्तरावर अति उत्कृष्ट काम करणाऱ्या प्रत्येक जिल्ह्यातून एक ग्रामपंचायत अधिकारी यांना शासन स्तरावरून यशवंत पंचायत राज अभियान पुरस्कार सोहळ्यात पुरस्कार प्रदान करण्यात येतात. त्याच अनुषंगाने सन 2022-23 करिता भंडारा जिल्ह्यातून साकोली तालुक्यातील खैरी वलमाझरी ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी नरेश शिवनकर यांची निवड करण्यात आली होती.आज 27 मे रोजी मुंबई येथे सकाळी 11 वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पंचायत राज पुरस्कार सोहळ्याचे आयोजन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सन 2022-23 च्या राज्यस्तरीय आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्काराने नरेश शिवनकर यांना सपत्नीक पुरस्कृत करण्यात आले. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत श्री उमेश नंदागवळी, श्री पी.व्ही.जाधव,गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी पंचायत,आदर्श सरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य,ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे सर्व पदाधिकारी यांच्यासह इतरांना दिले आहे.

Agm News 24
Author: Agm News 24

Leave a Comment

और पढ़ें

किसानो को सरसकट मिले नुकसान का मुआवजा, कोई भी नुकसानग्रस्त किसान मदद से वंचित ना रहे इसका विशेष ध्यान रखे – विधायक विनोद अग्रवाल, विधायक विनोद अग्रवाल ने फसलो के हुए नुकसान के लिए तत्काल पंचनामे करने के दिए निर्देश

किसानो को सरसकट मिले नुकसान का मुआवजा, कोई भी नुकसानग्रस्त किसान मदद से वंचित ना रहे इसका विशेष ध्यान रखे – विधायक विनोद अग्रवाल, विधायक विनोद अग्रवाल ने फसलो के हुए नुकसान के लिए तत्काल पंचनामे करने के दिए निर्देश