गोंदिया(अनिल मुनिश्वर):-
*************************
दि.२४|५|२५ रोज शनिवारला शिव रेसीडेन्सी येथे स्व.श्री राहूल ब्राह्मणकर यांच्या जयंती प्रीत्यर्थ “कविता तुझ्यासाठी” काव्य पुस्तक प्रकाशन सोहळा साजरा व कवी संमेलन दोन सत्रात आयोजित करण्यात आला. पहिल्या सत्रात कार्यक्रमाचे उद्घघाटक लायकराम भेंडारकर जिल्हा परिषद अध्यक्ष गोंदिया,पद्मश्री डाॅ.परशुराम खुणे, भाष्यकार डाँ.गुरुप्रसाद पाखमोडे,कवी संमेलनाध्यक्ष अंजणाबाई खुणे विदर्भाची बहीणाबाई प्रमुख पाहुणे नगराध्यक्षा मंजुषाताई बारसागडे, रेशीम कापगते विदर्भ शिक्षक संघ अध्यक्ष,अॅड.दिलीप कातोरे,दामोदर चुटे,सौ.प्रमीला चुटे,मा.प्राचार्य पठाण,पत्रकार अश्विन गौतम व मान्यवरांच्या हस्ते काव्य पुस्तकाचे प्रकाशन झाले. याप्रसंगी सत्कारमूर्ती मा.राहूल दादा पाटील संस्थापक शिलेदार समुह नागपूर,सत्कारमूर्ती मा.अनन्या चुटे चेन्नई यांचे मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. उद्घघाटक मा. लायकराम भेंडारकर यांनी साहित्य काव्य नाट्य कलेला प्राधान्य देत नाट्यमंडळ स्थापन करण्याची मुंबई महाराष्ट्र शासनाकडे तरतूद दिली आहे.असे वक्तव्या केले. लेखनीची ताकद सत्याला वाचा फोडणारी असते.असे अमूल्य वक्तव्य दिले.भाष्यकार मा.गुरूप्रसाद पाखमोडे यांनी कविता तुझ्यासाठी ह्या काव्य पुस्तकाचे सार व कवीच्या अंतरंग ची महती आपल्या भाष्यातून सांगितले. पद्मश्री डाॅ.परशुराम खुणे यांनी साहित्य नाट्य काव्य आणि माणसाचे प्रत्यक्ष जीवन दोन्ही एकमेकांशी अनुरूप आहेत. साहित्य कवी लेखन हे सत्य जीवनातील परखड असे रूप दाखवते.कविता तुझ्यासाठीच्या कवयित्री श्रीमती रंजना राहूल ब्राह्मणकर यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत मोलाचे मार्गदर्शन आपल्या अध्यक्षीय भाषणात केले.पहील्या सत्राचे सुत्रसंचालन डाॅ. विक्रम राखडे व डाॅ.प्रिती राखडे यांनी केले.कवी संमेलनात अध्यक्ष मा.अंजणाबाई खुणे,प्रमुखा पाहुणे हरीभाऊ शिवणकर,केवळराम हेमणे,यशवंत ब्राह्मणकर,यशवंत कोरे, शशीकला मेंढे,दिशा शिवणकर,प्रतिभा फुंडे,देवेंद्र हेमणे यांच्या उपस्थितीत शिलेदार समुहातील व विदर्भातील कवींनी काव्य सादर करून त्यांना सन्मानित करण्यात आले.सुत्रसंचालन सुधा मेश्राम आभार ॠतुजा राहूल ब्राह्मणकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी छाया बोरकर,उमेश चुटे,प्रशांत चुटे,श्रद्धा चुटे यांनी सहकार्य केले.
