भंडारा(अनिल मुनिश्वर):-
***********************
संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या माफदा असोशिएशन ने रासायनिक खता सोबत कंपन्याद्वारे होत असलेल्या लिंकिंग विरुद्ध आवाज उठवलेला असून रासायनिक खत कंपन्यांची दादागिरी याच्यापुढे खपविल्या जाणार नाही फक्त आणि फक्त रासायनिक खत कंपन्या स्वतःच्या हित बघून लिंकिंग करीत असतात याचा विनाकारण भुर्दंड शेतकरी व कृषी निविष्ठा विक्रेत्यावर बसतो त्यामुळे कुणीही लिंकिंग असलेले खते खरेदी करू नका संघटनेचे हात मजबूत करा. लिंकिंगबाबत मुख्यमंत्री कृषिमंत्री यांच्याशी सकारात्मक चर्चा झालेली असून लवकरच याच्यावर तोडगा निघणार आहे त्यामुळे आज आपल्यापुढे सर्व रासायनिक खत कंपन्यांना या मंचावरून ताकीद देतो की खबरदार याच्यापुढे लिंकिंग करून खताच्या पुरवठा केला तर असा इशारा महाराष्ट्र फर्टीलायझर असोसिएशनचे अध्यक्ष विनोद तराळ पाटील हे कृषी निविष्ठा विक्रेत्याच्या वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त दिला.ॲग्रो डीलर असोसिएशन भंडारा द्वारे वार्षिक स्नेहसंमेलन व प्रशिक्षण केंद्राचे आयोजन करण्यात आले होते . या प्रशीक्षण व स्नेहमिलन मेळाव्याला सातशे चे वर कृषी निविष्ठा विक्रेते उपस्थित होते
यावेळी प्रशिक्षण कार्यक्रमाचे उदघाटन माफदा अध्यक्ष विनोद तराळ पाटील यांनी केले तर अध्यक्षस्थानी ॲग्रो डीलर असोसिएशन भंडारा चे मोरेश्वर बोरकर हे होते व राष्ट्रीयअध्यक्ष मनमोहन कलन्त्रीआणि माफदा महासचिव विपिन कासलीवाल यांनी टीवी स्क्रीन वर मार्गदर्शन व शुभेच्छा दिल्या प्रमुख अतिथी म्हणून मंचावर विभागीय गुण नियंत्रक निरीक्षक चंद्रशेखर कोल्हे ,कृषी उपसंचालक भंडारा पद्माकर गीदमारे, मोहीम अधिकारी वासनिक , माफदा चे ॲडव्होकेट गणेश शिंदे पुणे कुलकर्णी साहेब पुणे जिल्हासचिव सुनील पारधी पुरुषोत्तम लांजेवार,संपत कापगते यांचे शाल श्रीपळ देऊन सत्कार करण्यात आले व कोरकमेटीचे किशोर अतकारी,शुभम गुप्ता, प्रमोद कलन्त्री, सुहास टिचकुले, प्रामुख्याने उपस्थित होते.
विभागीय गुणनियंत्रक निरीक्षक चंद्रशेखर कोल्हे व पद्माकर गिदमारे या अधिकाऱ्यांनी कृषी निविष्ठा विक्रेत्यांना प्रशिक्षण दिले तर ॲड.गणेश शिंदे पुणे यांनी व्यवसाय करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणींबाबत मार्गदर्शन केले यावेळी भंडारा जिल्ह्याच्या टेलिफोन डायरेक्टरीचे विमोचन मान्यवरच्या हस्ते करण्यात आले.माफदा चे नवीन 60 सदस्यता धनादेश देण्यातआले व सर्व तालुका अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव यांचे सत्कार करण्यात आले, कार्यक्रम चे प्रास्ताविक सुनील पारधी यांनी केले तर आभार विजय हिवरकर यांनी मानले कार्यक्रमानंतर लगेच स्नेहभोज देण्यात आले.
