गोंदिया(अनिल मुनिश्वर):–
रस्ता सुरक्षा अभियान 2025 च्या अनुषंगाने दिनांक 28/01/2025 रोजी 11.00 ते 14.00 वाजेच्या दरम्यान गोंदिया जिल्ह्यातील तालुक्यातील महामार्ग पोलीस केंद्रं डोंगरगाव जिल्हा गोंदिया येथे रस्ता सुरक्षा व जनजागृती संबंधाने हेल्मेट वाटप व रक्तदान शिबिर चे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन न्यायाधीश विक्रम आव्हाड,JMFC कोर्ट सडक अर्जुनी, प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार अक्षय पोयाम,सडक अर्जुनी, पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल मुनिश्वर, ओमप्रकाश टेंभुर्णी आदिवासी वस्तीगृह अधीक्षक तळेगावकर, ब्लड बँकेचे डॉ. विनय मीराणी महामार्ग केंद्राचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत भुते हे हजर होतें.अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्याहस्ते नागरिकांना हेल्मेट वाटप करून हेल्मेट वापरण्या संबंधाने जनजागृती करण्यात आली तसेच रक्तदान शिबीर आयोजित करून रक्तदानाचे महत्त्व पटवून जनजागृती करण्यात आली.सदर वेळी बाई गंगाबाई रुग्णालय गोंदिया येथील ब्लड बँकेची वैद्यकीय टीम हजर होती.तसेच नागरिकांना वाहतुकीचे नियम,रस्त्यावर होणारे अपघात व उपाय योजना याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
