सडक अर्जुनी(अनिल गो.मुनिश्वर):–
24/01/2025 रोजी रात्री 01/50 वा. सुमारास पोलीस स्टेशन डुग्गीपार कार्यक्षेत्रात पेट्रोलिंग दरम्यान ट्रॅक्टरने रेती चोरी करून वाहतुक करतांनी मिळून आलेल्या एका ट्रॅक्टरला ताब्यात घेवून पोलीस स्टेशनला आणण्यात आले व आरोपी चालक नामे हर्षद काशीराम भूमके वय 27 वर्षे रा.सावंगी व मालक नामे नीलकंठ रतन कापगते वय 50 वर्षे रा.भदुटोला यांचे ट्रॅक्टर क्र.MH 35G5694 व ट्रॉली क्र.MH35F4638 किं.4,00,000/-रु. व त्यामध्ये एक ब्रास रेती किं.6000/-रु. असा एकुण 4,06,000/-रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीतांविरुद्ध कलम 303(2), 49 भारतीय न्याय संहीता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही मा.गोरख भामरे पोलीस अधिक्षक गोंदिया,नित्यानंद झा अप्पर पोलीस अधिक्षक गोंदिया कॅम्प देवरी, विवेक पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी, देवरी यांचे मार्गदर्शनात ठाणेदार मंगेश काळे पो.स्टे. डुग्गीपार सोबत पोना महेंद्र सोनवाने,पोशि सुनील डहाके, महेंद्र मलगामे, निखिल मेश्राम यांनी केली.
