गोंदिया(अनिल गोविंदराव मुनिश्वर):–
गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनियुक्त पालकमंत्री नामदार श्री बाबासाहेब पाटील, यांचे गोंदिया मध्ये प्रथम आगमन प्रसंगी स्वागत व पालकमंत्री नियुक्ती पर सत्कार, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनियुक्त आमदार श्री राजकुमार जी बडोले व तुमसर मोहाडी क्षेत्राचे आमदार श्री राजूभाऊ कारेमोरे यांचा जाहीर सत्कार कार्यक्रम माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या अध्यक्षतेत, श्री विनोद हरिणखेडे, श्री नरेश माहेश्वरी, श्री प्रभाकर दोनोडे, श्री रमेश ताराम, जिल्हाध्यक्ष श्री प्रेमकुमार रहांगडाले, श्री सुरेश हर्षे, सौ. राजलक्ष्मी तुरकर, श्री केतन तुरकर, डॉ.अविनाश जायस्वाल श्री. योगेंद्र भगत, श्री अजय गौर, श्री गणेश बरडे, श्री किशोर तरोणे, श्री डी यु रहांगडाले, श्री टी एम पटले, श्री मोहनलाल पटले यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक 25 जानेवारी 2025, शनिवारला दुपारी 4.30 वाजता न.मा.द.महाविद्यालय ऑडिटोरियम मध्ये जाहीर सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.
सत्कार समारंभाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वरिष्ठ पदाधिकारी व सदस्य सर्व सेल व आघाड्यांचे पदाधिकारी जिल्ह्यातील सर्व सेल चे तालुका अध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य व प.स सदस्य. न. प. सदस्य व सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ता यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे ही विनंती तसेच फोनची वाट न पाहता सत्कार समारंभाला अवश्य उपस्थित राहावे असे आवाहन गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे करण्यात आले आहे…
