तालुक्यातील सौन्दड येथील लोहिया शिक्षण संस्था द्वारा संचालित रामेश्वरदास जमुनादास लोहिया माध्यमिक व उच्च माध्यमिक (कला व विज्ञान) विद्यालय सौंदड येथे दिनांक 22 जनवरी 2025 रोज बुधवारला विद्यालयाच्या प्राचार्या मा. उमा बाच्छाल यांच्या अध्यक्षतेखाली 18 वर्षाखालील मुला-मुलीना सायबर गुन्हे या विषयी जनजागृती व मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथि तसेच मार्गदर्शक म्हनून डुग्गीपार पोलिस स्टेशन येथील सहायक पोलिस निरीक्षक मा. रूपाली पवार, पोलिस नाईक मा. पी.एम.चकोले यांनी मार्गदर्शनात
म्हटले की तुम्ही संकटात सापडल्यास शासनाच्या हेल्पलाइन नंबरवर कॉल करुन मदत मागु सकता. तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षा यांनी विद्यार्थ्यांना सायबर गुन्हेपासून दूर राहावे असे मोलाचे मार्गदर्शन केले.
यावेळी पोलिस हवालदार मा. एम. जी. इंगळे, प्राध्यापक डी. ए. दरवडे, स. शि. टी. बी. सातकर व वर्ग 10 ते 12 चे विद्यार्थी मोठ्या संख्यने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन यु. बी. डोये यांनी केले तर आभार स. शि. वाय. एम. बोरकर यांनी मानले.
