अनिल बीसेन सभापती होताच दुसऱ्या दिवशी घेतली आढावा बैठक

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

देवरी(सुभाष काशिवार):–

कोणत्या न कोणत्या व्यक्तीमध्ये नक्कीच आपापल्या कार्यक्षेत्रातील कार्यात काम करण्याची व्यक्तीमत्व एक कला असते. याच कलेच्या अनुषंगाने देवरी पंचायत समितीचे नवनियुक्त सभापती अनिल बिसेन यांना राजकीय क्षेत्रातील कार्य करण्याचा दांडगा अनुभव असल्यामुळे लगेच दुसऱ्या दिवशी २१ जानेवारीला पंचायत समिती अंतर्गत सर्व विभागातील अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली.
सदर आढावा बैठक पंचायत समितीच्या सभागृहात झालेल्या बैठकीचे अध्यक्ष हे स्वतः अनिल बिसेन होते. यावेळी उपसभापती शालीकराम गुरनूले, माजी सभापती अंबिका बंजार, सदस्या भारती सलामे, प्रल्हाद सलामे, गटविकास अधिकारी जी. टी. सिंगनजुडे, तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, सर्व विभागाचे अधिकारी आणि ग्राम पंचायत अधिकारी उपस्थित होते.
या आढावा बैठकीत जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम, मनरेगा अंतर्गत कामे, बांबू लागवड, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत कचरा संकलन, सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन, ओडीएफ प्लस गाव करणे, घरकुल योजना बांधकाम, मोदी आवास योजना, शबरी आवास योजना, रमाई आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना अशा सर्व योजना पंचायत समिती अंतर्गत येत असल्यामुळे सर्व योजनेचा आढावा घेऊन सभापती अनिल बिसेन यांनी असलेल्या दांडगा अनुभव विषयी उत्तम मार्गदर्शन केले.

AGM News24
Author: AGM News24

Leave a Comment

और पढ़ें