गोंदिया(अनिल गो.मुनिश्र्वर):—
जिल्ह्यातील
निसर्ग सौंदर्याने नटलेला निसर्गरम्य नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान आपले गतवैभव प्राप्त करीत आहे. आधीच निसर्गाची मुक्त उधळण असलेल्या या राष्ट्रीय उद्यानात हिलटॉप गार्डन, मिरर हाऊस, सोबतच आता नव्याने तयार होत असलेल्या राॅक गार्डनने बच्चे कंपनी सहित पर्यटकांना भुरळ घातली आहे. नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यानाच्या गतवैभव प्राप्तीसाठी या विभागाचे आमदार तथा माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले असल्याचे दिसून येत आहे. गेल्या आठ वर्षापासून लोकार्पणाच्या प्रतिक्षेत असलेला एमटीडीसी रिसॉर्ट आता बडोले साहेबांच्या प्रयत्नाने नऊ वधू सारखा सजत असून या रिसॉर्टचे ऑनलाइन लोकार्पण सात जानेवारीला संपन्न झाले आहे.
राष्ट्रीय उद्यान नवेगाव बांध ही नैसर्गिक देणंच आहे. हे उद्यान एकेकाळी पशु पक्षी, उद्याने ,विविध जनावरे ,नैसर्गिक सौंदर्य यांनी बहरलेले होते. मागील काही वर्षांपूर्वी या राष्ट्रीय उद्यानाला अवकळा आली होती. मात्र या विभागाचे आमदार राजकुमार बडोले यांनी २००९ पासून तर नवेगाव बांध फाउंडेशन च्या वतीने या उद्यानाच्या गतवैभवासाठी सुरुवात करण्यात आली. सर्वप्रथम हिलटॉप गार्डन ची डिझाईन आणि डेव्हलपमेंट इंजि. सुनील तरोणे यांच्या सुपीक कल्पनेतून नवेगाव बांध फाउंडेशनच्या वतीने निव ठेवण्यात आली. यासाठी काही निधीची व्यवस्था माजी मंत्री बडोले यांनी करून दिली. व हिलटॉप गार्डन आकर्षित व मनमोहक तयार करण्यात आले. त्यानंतर मिरर हाऊस तयार करण्यात आले. आणि आता राॅक गार्डन बच्चेकंपनी साठी आनंदाची पर्वणी ठरत असून अजूनही या गार्डनचे सौंदर्यकरणाचे काम युद्ध स्तरावर सुरू आहे. या उद्यानातील जलाशयावर नौका विहार सुरू होते. मात्र गेल्या दोन वर्षापासून वन विभाग व संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या अंतर्गत कलाहाने दोन वर्षापासून नौकाविहार बंद असल्याने दहा लाखाच्या नौका सध्या बंद आहेत. त्यामुळे पर्यटक सुद्धा निराश झाले आहेत.
गतवैभव प्राप्तीसाठी आमदार बडोले यांची जोरदार तयारी
नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यानाचे गतवैभव प्राप्त करण्यासाठी या क्षेत्राचे आमदार माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. या उद्यानातील संजय कुटी परिसरात 16 एकर जागेत 2016 मध्ये एमटीडीसीच्या माध्यमातून रिसॉर्ट तयार करण्यात आले. राज्यसभा खासदार प्रफुल पटेल व माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी रिसॉर्टसाठी मोठ्या प्रमाणात निधी आणून हे काम पूर्णत्वास नेले. आज तब्बल आठ वर्षानंतर आमदार बडोले यांच्या प्रयत्नाने सात जानेवारीला या रिसॉर्टचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते करण्यात आले. या पर्यटन स्थळी पर्यटकांना राहण्याकरिता महामंडळांनी प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून 21 कोटीच्या निधीतून उत्तम सुविधेने सज्ज असलेले पर्यटक निवास चांदपूर या नावाने सुरू केले आहे. या रीसाट मध्ये आता लग्न समारंभ व इतर कार्यक्रमासाठी ऑनलाईन बुकिंग सुरु झाली असून आता कार्यक्रमाची रेलचेल वाढून पर्यटनाचे दृष्टीने व पर्यटकांना मुक्कामाचे दृष्टीने उपयुक्त ठरणार आहे. नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यानाच्या गतवैभवासाठी आमदार बडोले यांनी पाऊल उचलले असून नौकाविहार सह मनोहर उद्यानासारखे बाग बगीचे कसे तयार करता येतील. याबाबत आमदार बडोले माहिती घेत असून नुकतेच त्यांनी या परिसराची पाहणी करून पर्यटकांशी संवाद सुद्धा साधला आहे.
