गोंदिया(अनिल गो.मुनीश्र्वर):–
अर्जुनी/ मोर येथील 17 शिक्षकांचे एकस्तर वेतनश्रेणी चे प्रस्ताव गट शिक्षणाधिकारी अर्जुनी/मोर यांच्या स्वाक्षरी ने जिल्हा पारिषद ला पाठविण्यात आले. ते एकस्तर वेतन श्रेणीचे एकूण 17 प्रस्ताव जिल्हा परिषद कडून मंजूर करून सदर पंचायत समितिला पाठविण्यात आले. परंतु येथील गट शिक्षणाधिकारी यांनी 17 पैकी 5 लोकांना देयके मंजूर करून 12 लोकांना देयके देता येणार नाही. असे बोलून त्यांच्या सेवा पुस्तिका वर आपल्या मार्जिने क्रास ( ×) केले व त्यांना त्यांच्या लाभा पासून वंचित ठेवले. त्याची तक्रार महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व अधिकारी संघटना गोंदिया ने मुख्य कार्यपालन अधिकारी जिल्हा परिषद गोंदिया यांना केली. त्या संदर्भात आज जिल्हा पारिषद गोंदिया च्या पेंशन अदालत मध्ये मुद्दा उपस्थित करण्यात आले. ,उप मुख्य कार्यपालन अधिकारी यांनी लेखा वित्त विभागाचे अशोक बांगडे यांच्याशी शहानिशा केली असता, जिल्हा पारिषद ने मंजूर केलेल्या देयकांना नामंजूर करण्याचे अधिकार पंचायत समितिला नाही. त्यावर सविस्तर चर्चा केली असता लेखा वित्त विभागाकडून मंजूर झालेल्या 12 शिक्षकांना देयके त्वरित देण्यात यावे असे निर्देश उप मुख्य कार्यपालन अधिकारी फरेंद्र कुतिरकर यांनी सांगितले.
तसेच संगणक, उपदान, नक्षल भत्ता, एकस्तर वेतन श्रेणीचा लाभासाठी या आठवड्यात अनुदान देण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच चटोपाध्याय व निवड श्रेणी प्रस्ताव, आरोग्य सेविका यांचे संगणक वसुली रक्कम मिळण्याबाबद सामान्य प्रशासन विभागाला फाईल पाठविले, सुधाकर तिडके यांचे दुय्यम सेवा पुस्तिका तयार करण्याचे काम सुरु , सातव्या वेतन आयोगाचा शिल्लक असलेल्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना पाचव्या हप्त्याची राशी देणे , गोरेगाव येथील सेवानिवृत्त कर्मचारी तिवारी यांना बदली प्रवास भत्ता अनुदान मिळताच देण्याचे सांगीतले. ईतर विषयावर चर्चा केली.
या वेळी उप मुख्य कार्यपालन अधिकारी फरेंद्र कुतिरकर , लेखा व वित्त विभागाचे अशोक बागडे, उप शिक्षणाधिकारी लांडे व शिक्षण विभागाचे कर्मचारी, आरोग्य विभागाचे प्रमोद काळे, श्याम लिचडे, तालुक्यातील सर्व विभागाचे प्रमुख, सेवानिवृत्त संघटनेचे जिल्हाध्यक्ष एल यू खोब्रागडे, कोषाध्यक्ष डी. एल. गुप्ता, राज्य उपाध्यक्ष पी. आर. पारधी,टीकाराम भेंडारकर, डी. एम. दखने, टी. एन. बहेटवार, सुरेश आष्टीकर, पी. एल. पारधी, एच एन परशुरामकर, ठाकरे, बोपचे, तागडे, तुळसीकर, बारेवार, तिवारी, भेलावे व सेवानिवृत्त कर्मचारी उपस्थित होते..
