सडक अर्जुनी(अनिल गो.मुनीश्र्वर):–
दिनांक 12 जानेवारी ला राजमाता जिजाऊसाहेब यांची जयंती राजे ग्रुप घोटी तर्फे साजरी करण्यात आली.
या प्रसंगी राजमाता जिजाऊ यांच्या छायाचित्राला व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी सुधाकर ब्राह्मणकर, स्वप्नील ब्राह्मणकर, राजकुमार ब्राह्मणकर, उपराज कोरे, गोपीचंद वाढई ,टीकेश्वर कोरे, मुकुल कोरे, भूपेश वाढई ,जयेश ब्राह्मणकर, उज्वल हेमने सर्व राजे ग्रुप चे सदस्य आणि गावकरी मान्यवर उपस्थित होते .
