लोहिया विद्यालयात स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती साजरी

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सडक अर्जुनी(अनिल गो.मुनीश्र्वर):–

तालुक्यातील लोहिया शिक्षण संस्था द्वारा संचालित रामेश्वरदास जमनादास लोहिया माध्य . व उच्च माध्य.विद्यालय,रामदेवबाबा अध्यापक विद्यालय, जमुनादेवी लोहिया प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने सौंदड येथे दि.12 जानेवारी 2025 रोज रविवारला संस्थापक संस्थाध्यक्ष मा. जगदीश लोहिया यांच्या प्रेरणेने स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती लोहिया शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष मा. आ. न .घाटबांधे यांच्या अध्यक्षतेखाली, प्राचार्या मा. उमा बाच्छल,पर्यवेक्षक मा. डी. एस.टेंभुर्ण ,मुख्याध्यापक मा.मनोज शिंदे,प्राध्यापक मा .आर .एन. अग्रवाल यांच्या उपस्थितीत पार पडला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख अतिथींनी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पुजन करून माल्यार्पन केले. विद्यालयाच्या प्राचार्या यांनी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जीवन कार्यातून सर्वांनी प्रेरणा घ्यावी असे मोलाचे मार्गदर्शन केले तसेच या प्रसंगी विद्यालयातील प्राध्यापक आर. एन. अग्रवाल व जी. एस. कावळे यांनी आपल्या मनोगतातून स्वामी विवेकानंद तथा राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या महान कार्याची माहिती दिली . राष्ट्रीय युवा दिनानिमित सर्वाना शुभेच्छा दिल्या .
कार्यक्रमाला शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन स. शि. वाय. एम. बोरकर यांनी केले तर आभार स. शि. कु. यु. एस. जुमडे यांनी मानले.

AGM News24
Author: AGM News24

Leave a Comment

और पढ़ें