गोंडवाना चषक भव्य कबड्डी स्पर्धेला स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सडक अर्जुनी(अनिल गो.मुनीश्र्वर):–


गोंडवाना नाविन्यपूर्ण बहुउद्देशीय संस्था व शिवसाई मंदिर समिती तथा शारदा महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सडक अर्जुनी येथे ६ व ७ जानेवारी २०२५ ला भव्य कबड्डी स्पर्धेचे( गोंडवाना चषक )आयोजन करण्यात आले होते.सदर स्पर्धेला
स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
६ जानेवारीला भव्य कबड्डी स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अर्जुनी मोर.विधानसभा क्षेत्राचे आमदार तथा माजी सामाजिक न्यायमंत्री इंजि. राजकुमार बडोले होते. कार्यक्रमाचे उपाध्यक्ष म्हणून नगरपंचायतच्या उपाध्यक्षा वंदना डोंगरवार होत्या.कार्यक्रमाचे उदघाटन सडक अर्जुनी नगरपंचायतचे नगराध्यक्ष तेजराम मडावी यांच्या हस्ते करण्यात आले.सहउद्घाटक म्हणून नगरसेविका तथा माजी नगराध्यक्षा शशिकला टेंभुर्णे होत्या.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक गोपीचंद खेडकर, महेंद्र वंजारी व इतर मान्यवर उपस्थित होते.

सदर कबड्डी स्पर्धेत पुरुष गटातून प्रथम क्रमांक विद्युत क्रीडा मंडळ मोहाडी व संघ, द्वितीय क्रमांक आदिवासी संघ, तृतीय क्रमांक शिवगर्जना संघ रामटेक आणि चतुर्थ क्रमांक गोंडवाना क्रीडा मंडळ सडक अर्जुनी यांनी पटकाविला. तसेच महिला गटातून प्रथम क्रमांक मराठा लाऊन्सर,द्वितीय क्रमांक सिटी पोलीस नागपूर, तृतीय क्रमांक पहेला
व संघ आणि चतुर्थ क्रमांक शिवगर्जना संघ रामटेक यांनी पटकाविला.

७ जानेवारीला बक्षीस वितरण कार्यक्रम गोंडवाना क्रीडा मंडळाचे अध्यक्ष वसंत लांजेवार, अध्यक्षा अंजना लांजेवार, शिवशाही मंदिर समितीचे अध्यक्ष बाळकृष्ण येरणे, उपसरपंच तुकाराम राणे, ओमेश्वर कापगते,ज्ञानेश्वर पर्वते, प्रीतम शहारे, कटरे, नेवारे, इस्कापे,मंदा लांजेवार, उषा येरणे, शोभा कटरे, लता पर्वते, चेतना येरणे आदी मान्यवरांच्या उपस्थित पार पडला.यावेळी विजयी संघांना आकर्षक चषक व रोख बक्षीस देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
सदर क्रीडा स्पर्धा यशस्वीतेसाठी तुकाराम राणे, शुभम येरणे,रोशन गहाणे,अक्षय लांजेवार, ओमराज वाढई,सचिन खांडवाये,पिंटू मरस्कोले,डिलेश्वर कोरे
आदींनी सहकार्य केले.

AGM News24
Author: AGM News24

Leave a Comment

और पढ़ें

  • Buzz Open / Ai Website / Ai Tool