गोंदिया(अनिल गो.मुनीश्र्वर):–
जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील महामार्ग क्रमांक 53 वर फुटाळा येथे दिनांक 6 जानेवारी 2025 ला सडक अर्जुनीचे वनपरिक्षेत्र अधिकारी मिथुन तरोणे रात्री गस्तीवर असतांनी गोपनीय सूत्रांची आधारे माहिती मिळाली की शेंडा परिसरातून एक मालवाहतूक गाडी क्रमांक MH 40 BG 3801 बिना परवाना सागवांची वाहतूक करताना वनपरिक्षेत्र अधिकारी मिथुन तरोणे यांना फुटाळा गावाजवळ गस्ती करत असताना संसयास्पद आढळून आलेल्या वाहनाची तपासणी केली असता त्या वाहनांमध्ये मोठें मोठें सागवान चे नग आढळून आलें.अंदाजे 3 लाख रुपयांचा सागवान व दहा लाखाची मालवाहक गाडी असा 13 लाखाचा ऐवज वनपरिक्षेत्र अधिकारी मिथुन तरोणे यांनी हस्तगत केला असून
सडक अर्जुनी तालुक्यामध्ये होत असलेली सागवान चोरी व रेती चोरी मुळे वनपरिक्षेत्र अधिकारी मिथुन तरोने
ॲक्शन मोडवर काम करताना दिसतात सध्या तालुक्यामध्ये सागवान चोरीचे मोठ्या प्रमाणात व्यवसाय सुरू असल्यामुळे वनपरिक्षेत्र अधिकारी रात्रीला गोपनीय स्तरावर गस्ती करतात मिथुन तरोणे वनपरिक्षेत्र कार्यालय सडक अर्जुनी चा पदभार सांभाळल्यापासून सागवान चोर ठेकेदार. रेती तस्कर यांचे धाबे दणाणले आहे.सदरची कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी मिथून तरोने यांच्या नेतृत्वात करण्यात आली तीनही आरोपी जितेंद्र रमेश राऊत वय 38 राहणार कळमेश्वर नागपूर,गुणवंत धनराज फुन्ने वय 40 मालवाहक मालक गुंथळा जिल्हा नागपूर,अनुज अशोक भोयर वय 22 वाहन चालक परसोडी जिल्हा नागपूर यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता तीन दिवसाची वन कोठडी ठेवण्यात आली आहे
पुढील तपास सुरू आहे