सडक अर्जुनी(अनिल गो.मुनीश्र्वर):-
तालुक्यातील कोहमारा येथील देवेंद्राबाई पंढरी खोब्रागडे वय 57 हिची हत्या झाल्याची बातमी दिनांक सहा जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता पसरताच पोलीस घटनास्थळावर पोहोचून चौकशी केला असता हत्या शनिवारी चार जानेवारी रोजी रात्री च्या दरम्यान झाल्याचा संशय व्यक्त करून तपास सुरू केला घटनास्थळी गोंदिया जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक गोरख भांबरे यांनी तातडीने भेट देऊन पाहणी केली व डॉग स्कॉडला पाचारण केले परंतु दिवसभर काहीही निष्पन्न झाले नाही पुढील तपास सुरू आहे
सविस्तर असे की देवेंद्राबाई ही एकटीच राहत होती तिची हत्या कोणी व कशी केली संशयास्पद असून पुढील तपास पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनात देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील तसेच दुग्गीपार पोलीस स्टेशनचे ठाणेदार मंगेश काळे करीत आहेत