सडक अर्जुनी तालुका पत्रकार संघातर्फे आज दि. 6 जानेवारी रोज सोमवारला आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती चे औचित्य साधून राष्ट्रीय मराठी पत्रकार दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी ग्रामीण रुग्णालय सडक अर्जुनी येथे रुग्णांना फळ व बिस्कीट वाटप करण्यात आले. व रुग्णांची विचारपूस करण्यात आली. याप्रसंगी ठाणेदार मंगेश काळे, डॉ. संकेत परशुरामकर, डॉ. सत्यम कटरे, पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल मुनीश्वर, चंद्रमुनी बन्सोड,अशोक इळपाचे,अश्लेष माडे, उमराव मांढरे,युवराज वालदे,अरविंद मेंढे आदी उपस्थित होते.