गोंदिया(प्रतिनिधी):-
वीर एकलव्य यांना ढिवर समाज आराध्य दैवत मानतो. ढिवर समाजाची आर्थिक परिस्थिती चांगली नाही, अज्ञान, गरिबी मध्ये हा समाज भरकटलेला आहे.आजपर्यंत या समाजाचा आजपर्यँत राजकीय वापर करण्यात आला परंतु त्याच्या समस्या कुणीही दूर केल्या नाही. आजही मासेमारी च्या समस्या, शिक्षण, आरोग्य समस्या खूप प्रमाणात भेडसावत आहेत त्याचा कुणीही वाली नाही राजकीय लोक फक्त आपला राजकीय उद्देश पूर्ण करण्या करिता तात्पुरते सोबत घेतात निवडून आल्यावर समाजाला वाऱ्यावर सोडतात त्या मुळे समाजाने अशा लोकांना गुरु मानून त्यांना अगठा दान करू नये उलट सर्वांनी एकत्र येऊन राजकीय दबाव निर्माण करून आपल्या समस्या, मागण्या पूर्ण करण्यास भाग पाडावे असे उदगार संघर्ष वाहिनी चे संयोजक उमराव मांढरे यांनी वीर एकलव्य जयंती सिलेझरी या कार्यक्रमा च्या मचावरून उदघाटनिय भाषनातून बोलत होते. 4 जानेवारी ला सिलेझरी येथे वीर एकलव्य जयती कार्यक्रम आयोजित करण्यात आला कार्यक्रमाचे उदघाटन उमराव मांढरे संयोजक संघर्ष वाहिनी, कार्यक्रम चे अध्यक्ष जनार्धन नागपुरे, दीप प्रज्वलक लताताई भेडारकर सरपंच सिलेझरी, सह उदघाट्क परेश दुरुगवार, ध्वजारोहक मणिराम मौजे गोंदिया,सुखदेव मेंढे उपसरपंच तर प्रमुख पाहुणे अशोक शेंडे आरोग्य विस्तार अधिकारी सडक अर्जुनी, राजू वलथरे से. नी. खडविकास अधिकारी, शालूताई कोल्हे निमगाव, नंदू उके जिल्हा अध्यक्ष निषाद पार्टी,केशवं कोल्हे, देवराम सिंदे लाईनमेन, विशाखा वॉलदे, प्रकाश टेभूरणे यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला. कार्यक्रम मध्ये ऐकल्य रॅली, सांस्कृतीक कार्यक्रम, समाज प्रबोधन मेळावा, रांगोळी स्पर्धा, स्वच्छता अभियान असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले.कार्यक्रम चे प्रास्ताविक मारोती गोपे, संचालन ओमराज गोपे तर आभार श्रीपत गोपे यांनी केला. कार्यक्रम यशस्वीते साठी मत्स्य गंधा महिला बचत गट, एकलव्य स्मारक समिती, दीपक गोपे, अविनाश मेश्राम, बलदेव मेश्राम, दिलीप गोपे, आसाराम गोपे व संपूर्ण ढिवर समाज सिलेझरी यांनी सहकार्य केले.