विधानसभा क्षेत्रातील विकासकामे वेळेवर करा-आ.विजय रहांगडाले

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

गोंदिया(अनिल गो.मुनीश्र्वर):-

नुकताच विधानसभा निवडनुकीचा निकाल लागला असून त्यामध्ये तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्रात भाजपतर्फे सलग तीस-यांदा विजय रहांगडाले यांनी बाजी मारली आहे पदभार स्वीकारताच विधानसभा क्षेत्रातील विविध समस्या मार्गी लावण्याकरिता जिल्हाधीकारी गोंदिया यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभाग प्रमुखांसोबत आढावा बैठक घेण्यात आली यामध्ये प्रामुख्याने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना वेळेवर देण्याबाबत आदेश देण्यात आले, सार्व. बांधकाम विभागांतर्गत रस्ते व पुलाचे कामे मुदतीच्या आत करण्यात येवून दर्जेदार कामांकडे विशेष लक्ष देणे, जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील सर्वे कामे सुरु करण्यात यावी, तिरोडा गोंदिया राष्ट्रीय महामार्ग लवकर पूर्ण करण्यात यावे, अदानी पॉवर लिमिटेड समोर मोठ्या प्रमाणात रस्ता खराब असून राखेच्या वाहतुकीमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असून त्यावर जिल्हाप्रशासनाने लक्ष द्यावे, इंग्रजकालीन पोंगेझरा येथे भौतिक सुविधांचा विकास करणे, निमगाव (आंबेनाला) प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणे आदी महत्वपूर्ण विषयावर चर्चा करण्यात आली यावेळी प्रामुख्याने जिल्हाधिकारी प्रजीत नायर, तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले व संबधीत सर्व विभागाचे सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

AGM News24
Author: AGM News24

Leave a Comment

और पढ़ें

  • Buzz Open / Ai Website / Ai Tool