लोहिया विद्यालयातील विद्यार्थ्यांची विज्ञान प्रदर्शनीत जिल्हास्तराकरीता निवड

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सडक अर्जुनी(प्रतिनिधी):-

तालुक्यातील सौंदड येथील लोहिया शिक्षण संस्थाद्वारा संचालित रामेश्वरदास जमनादास लोहिया माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय सौंदड येथील विद्यार्थ्यांनी दिनांक २ जानेवारी २०२५ रोज गुरुवारला नवजीवन विद्यालय राका येथे पार पडलेल्या 52 व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीत वर्ग ९ ते १२ च्या माध्यमिक गटातून वर्ग ११ वी विज्ञान चे विद्यार्थी अथर्व सुनील भैसारे व जतिन छगन निंबेकर या विद्यार्थ्यांच्या प्रयोगाचे जिल्हास्तराकरता निवड झाल्या बद्दल मा.जगदीश लोहिया संस्थापक संस्थाध्यक्ष लो.शि. संस्था यांनी अभिनंदन केले .
लो.शि.संस्थेचे उपाध्यक्ष मा. आनंदराव घाटबांधे ,विद्यालयाच्या प्राचार्या मा. उमा बाच्छल , पर्यवेक्षक डी .एस. टेंभुर्णे , प्राध्यापक आर .एन. अग्रवाल, स. शिक्षिका सौ. के.एस.काळे यांनी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले असून पुढील जिल्हास्तरीय स्पर्धे करता शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांनी आपल्या प्रयोगाचे श्रेय प्राध्यापक एस .पी. करंबे व स.शि.एम एम.कापगते यांना दिले.

AGM News24
Author: AGM News24

Leave a Comment

और पढ़ें

  • Buzz Open / Ai Website / Ai Tool