युवतींनो क्रांतीज्योतीसावित्रीबाई चाआदर्श घ्या – डॉ हुबेकर

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

गोंदिया(अनिल गो.मुनीश्र्वर):–



स्थानिक जिल्हा सामान्य
के टी एस रुग्णालयात
डायेलिसिस विभागात
3 जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्ताने मोफत आभा कॅम्प शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या कॅम्प चे उद्घाटन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीप
प्रज्वलन करून माजी सभापती मा भावनाताई कदम यांच्या शुभ हस्ते
करण्यात आले
या प्रसंगी डायलिसिस विभागाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ सुवर्णा हुबेकर
इंचार्जे नर्सिंग ऑफिसर दीपाली वानखेडे पी एच एन
अर्चना वासनिक नर्गिस अली
भूमेषा लँजे श्रीमती चौधरी श्रीमती किरणापुरे आदि प्रामुख्याने उपस्थित होत्या
या प्रसंगी मार्गदर्शन करताना वैद्यकीय अधिकारी डॉ सुवर्णा हुबेकर यांनी आवाहन केले की आज च्या युवतींनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा आदर्श घ्यावा महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी योजना अंतर्गत के टी एस सामान्य रुग्णालयात मोफत
डायलिसिस ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्याचा लाभ
घ्यावा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने मोफत आभा कार्ड नोंदणी चे आयोजन करण्यात आले होते जीवनदायी योजनेचा
लाभ घेण्यासाठी आभा कार्ड जरुरी असते म्हणून नागरिकानी आभा कार्ड
म्हणजे डिजिटल हेलथ कार्ड काढून ठेवावे असे आवाहन डॉ सुवर्णा हुबेकर यांनी
या प्रसंगी केले.
कॅम्प साठी जीवनदायी योजनेचे श्री दुर्गेश नागपुरे व श्री टेम्भुरने व आरोग्य मित्र यांनी सहकार्य केले.

AGM News24
Author: AGM News24

Leave a Comment

और पढ़ें

  • Buzz Open / Ai Website / Ai Tool