सडक अर्जुनी(अनिल गो.मुनीश्र्वर):-
तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय फुटाळा येथे सावित्री बाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. सुरुवातीला सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमे चे पूजन करण्यात आले,या वेळी गावातील सरपंच सौ.लताताई गहाणे,उपसरपंच सौ.गीताताई मेश्राम, ग्रा.सदस्य प्रभाकरजी गोबाडे,अरविंदजी सोनवाने, सेवनबाई गहाणे, योगिताताई गहाणे, वनिताताई गोबाडे,तसेच अंगणवाडी सेविका, सुंनंदाताई गहाणे, तसेच आरोग्य सेविका भानारकर ताई.. तसेच रोजगार सेवक तेजरामजी मेश्राम, तसेच ग्रामपंचायत परिचर सुनील भाऊ सोनवाणे आणि योजनादूत राहुलभाऊ गोबाडे उपस्थितीत जयंती साजरी करण्यात आली,यावेळी सरपंच लताताई गहाणे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकत मार्गदर्शन केले