सडक अर्जुनी(अनिल मुनीश्र्वर):-
तालुक्यात मोठ्या प्रमाणात रेती घाट आहेत. परंतु रेत घाटाचे लिलाव झाले नसताना सुद्धा सडक अर्जुनी तालुक्यात मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा सुरू आहे. मात्र याकडे महसूल व पोलीस विभागाचे दुर्लक्ष झाले असून वाळू तस्करी ला उधाण आल्याचे दिसून येत आहे. यामुळे तालुक्यात सुरू असलेल्या रेती तस्करीच्या अनाधिकृत गोरख धंद्याला आता उधाण आले आहे. तालुक्यात टिप्पर ,ट्रक व ट्रॅक्टरच्या माध्यमातून अवैध रेती वाहतूक केली जात आहे.रेती घाटाचे लिलाव झाले नसताना सुद्धा रेती उपलब्ध होते कशी? असा प्रश्न आता तालुका वाशियांकडून उपस्थित केला जात आहे.
सविस्तर असे की सडक अर्जुनी तालुक्यात नदी आणि नाल्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यातच खोडसिवणी, घाटबोरी/ तेली, डोंगरगाव /खजरी, खडकी/ बामणी, डोंगरगाव डेपो, बामणी सडक, पळसगाव/ राका, पिपरी, सौंदड नंबर 1, व सौंदड नंबर 2, तसेच सावंगी नंबर 1,व सावंगी नंबर 2 या रेती घाटामधून मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी सुरू असताना सुद्धा महसूल व पोलीस प्रशासन नाच्या आशीर्वादानेच तालुक्यात रेती तस्करांना पाठबळ मिळत असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.
तालुक्यात टिप्पर , ट्रक व ट्रॅक्टरच्या माध्यमातून अवैध रेती वाहतूक केली जात आहे. या संदर्भात रेतीची तस्करी करणाऱ्या वाहनावर दंड थोपाटण्यात येत असले तरी रेतीची तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टर मालकाकडून प्रती महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्याला महिन्याकाठी 10 हजार रुपये दिले जात असल्याने आमचे कुणी काही बिघडवू शकत नाही अशी चर्चा तस्कराकडूनच आता पान टपरी, पान ठेवल्यावर सुरू झाली आहे. एवढेच नव्हे तर रेती तस्करांवर आळा घालणारी 112 नंबरची यंत्रणा सुद्धा आता कुचकामी ठरू लागले आहे. त्यामुळे तालुक्यात रेती तस्करांच्या बोलबाला सुरू आहे. बामणी/ सडक ते कोहळीटोला या मार्गाने सुद्धा रेतीची तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू असताना सुद्धा कारवाई मात्र थंड बसत्यात दिसून येते. घाटातून रेतीचा उपसा केला जात असताना सुद्धा महसूल विभागाकडून कुठली मोठी कारवाई केली जात नसल्याने. तालुक्यात रेती उत्खनन व तस्करीला उधाण आले आहे. कारवाईसाठी निघालेल्या पथकाच्या धडक कारवाईपूर्वीच घटनास्थळावर तस्कराकडून सर्व ऑलबेल करून घेतले जात आहे. एकंदरीत कारवाईच्या नावावर यंत्रणेकडून वराती मागून घोडे ,या म्हणी प्रमाणे कामकाज सुरू असल्याची चर्चा आहे.
अर्थकारणामुळे जनप्रतिनिधी देखील या गंभीर प्रश्नाकडे कानाडोळा करीत असल्याचे बोलले जात आहे.’ तेरी भी चुप मेरी भी चुप, या मनी प्रमाणे जनप्रतिनिधीं ना सुद्धा यात समाविष्ट करण्यात आले असून अंदाजे 2 लाख रुपये पर्यंत आर्थिक कमाई करण्याची संधी सुद्धा आता त्यांना उपलब्ध करून दिली जात असल्याने मिया बिबी राजी ,तो कोण करेगा काजी, या उक्तीप्रमाणे आम्हाला आता कुणाची भीती नाही. अशा चर्चा आता रेती तस्करांकडूनच पान टपरीवर रंगू लागले आहेत. त्यामुळे रेती तस्करीला आवर कोण घालणार ? असा प्रश्न आता तालुक्यातील सुज्ञ नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे .