करीअर मार्गदर्शन सत्राचे आयोजन

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सडक अर्जुनी(तालुका प्रतिनिधी):-

आदिवासी विकास हायस्कुल व कला,विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालय खजरी (डोंग.) आदिवासी बहुल ग्रामीण क्षेत्रात विद्यार्जनाचे कार्य सातत्याने गेल्या 40 वर्षांपासून करीत असे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वर्ग 10 वी नंतर काय ? स्पर्धा परीक्षेची तयारी आतापासून कशी करावी याकरीता आज दि.28 डिसेंबर 2024 रोज शनिवारला करीअर मार्गदर्शन व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले. विदर्भ स्टडी सर्कल गोंदियाचे संचालक त्रिलोक शेंडे मुख्य मार्गदर्शक म्हणून होते. उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य डी.डी. रहांगडाले,उमाशी प्रभारी वाय. टी. परशुरामकर, वर्ग 9 वी व वर्ग 10 वी चे वर्गशिक्षक तसेच वर्ग 9 वी व वर्ग 10 वी चे विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डी.डी. रहांगडाले यांनी केले तर संचालन ए.डी. मेश्राम व आभार जी.आर.येडे यांनी मानले

AGM News24
Author: AGM News24

Leave a Comment

और पढ़ें

  • Buzz Open / Ai Website / Ai Tool