गोंदिया(अनिल गो.मुनिश्र्वर):–
दिनांक 25/12/2024 ला येथील होप हार्ट हॉस्पिटल चे संस्थापक डॉ प्रमेश अनिरुद्ध गायधने यांनी आपल्या वाढदवसानिमित्त शिवाजीनगर कुडवा येथील पालावरची शाळेत नविन उपक्रम करत शाळेतील गरजु विद्यार्थ्यांना दैनंदिन उपयोगी (कंबल आणि चप्पल) साहित्य वाटप केले. भटके विमुक्त वस्तीत गरजु लोकांना सुद्धा साहित्य वाटप केले. दरम्यान डॉ गायधने यांनी शिक्षणाविषयी विद्यार्थ्यांना मोलाचे प्रेरणादायी मार्गदर्शन केले. ज्या विद्यार्थ्यांचे कोणी आश्रीत नाही, जे विद्यार्थी शिकू शकत नाहीत अशा विद्यार्थ्यांना मदत करणे हे आपले कर्तव्य आहे असे डॉ गायधने यांनी सांगितले. यावेळी श्री प्रशांत सर (शिक्षक), मनीष नागपुरे, नितेशकुमार गजघाट, मनीष गोंडाणे, भुमेश्वर राउत व शाळेतील कर्मचारी वर्ग उपस्थित होते.