सडक अर्जुनी(तालुका प्रतिनिधी):-
येथील तहसील कार्यालयात शासकीय वाहन नसल्याने अनेक कामांमध्ये व्यत्यय येत होते परंतु येथील तहसील कार्यालयाला नवीन वाहन मिळाल्याने समस्या दूर झाल्या असून मुख्यत्वे गौण खनिज अवैधरित्या वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी या वाहनाचा उपयोग होणार आहे.जुने वाहन खराब झाले असतानाही या कार्यालयाला वाहन उपलब्ध झाले नव्हते शासनाच्या पाठपुराव्याने नवीन वाहन उपलब्ध झाले असून तहसीलदार यांना सरकारी दौरे व अन्य ठिकाणी जाण्यासाठी अडचणीचा सामना करावा लागत होता,वारंवार मागणी केल्यावर 23 डिसेंबर 24 ला सडक अर्जुनी तहसील कार्यालयात वाहन उपलब्ध झाले असून या वाहनाचे पूजन तहसीलदार अक्षय पोयाम यांनी केले यावेळी नायब तहसीलदार प्रेरणा कटरे, जगदीश जांभुळकर, अविनाश घडोले,छाया रंहागडाले,वैशाली बागडे, चालक संजय कापगते व कर्मचारी उपस्थित होते