वार्षिकोत्सव निमित्त लोहिया विद्यालयात विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सडक अर्जुनी


तालुक्यातील लोहिया शिक्षण संस्था द्वारा संचालित रामेश्वरदास जमनादास लोहिया माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,
रामदेवबाबा अध्यापक विद्यालय व जमुनादेवी लोहिया प्राथमिक शाळा सौंदड यांच्या संयुक्त विद्यमाने लोहिया शिक्षण संस्थेचे संस्थापक संस्थाध्यक्ष मा. जगदीश लोहिया यांच्या प्रेरणेने सत्र २०२४- २५ मधील स्नेहसंमेलना निमित्य विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. त्यात वर्ग १ते ४, वर्ग ५ ते ७, वर्ग ८ ते १० , वर्ग ११ ते १२(कला व विज्ञान), डी. एल .एड प्रथम व द्वितीय वर्ष. यांच्या करिता लांब उडी, उंच उडी,२००,४००,८०० मीटर धावणे, कबड्डी इत्यादी स्पर्धा प्राचार्या मा. यु. आर. बाच्छल यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आल्या . कबड्डी सामन्यांमध्ये वर्ग ५ ते ७ मुलांच्या गटात वर्ग ७ अ , मुलींच्या गटात वर्ग ७ इ , ८ते१० च्या गटात वर्ग १० वा अ, वर्ग ११ ते १२ च्या गटात वर्ग १२ वा विज्ञान च्या चमू विजयी झाल्या. खेळाडूंचं उत्साह वाढवितांना लोहिया शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष मा.आ.न. घाटबांधे , मा. महादेवजी लाडे सदस्य शाळा सुधार समिती , रामदेवबाबा अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य मा.गुलाबचंद चिखलोंडे , क्रीडा शिक्षक एस. यु .पवार उपस्थित होते . तसेच सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

AGM News24
Author: AGM News24

Leave a Comment

और पढ़ें

  • Buzz Open / Ai Website / Ai Tool