सडक अर्जुनी
नवयुवक मंडई मंडळ सडक अर्जुनी च्या वतीने खास मंडई निमित्त 25 डिसेंबर रोजी सडक अर्जुनी येथे सकाळी 9 वाजेपासून विविध रंगारंग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मंडई उत्सवानिमित्त सकाळी 9 वाजता शाहीर संजय भाऊ चे चाचाने यांच्या संपूर्ण संचासह दुर्गा मंच सडक अर्जुनी येथे राष्ट्रीय संगीत खडा तमाशाचे आयोजन करण्यात आले आहे. तमाशाचे उद्घाटन नारायणजी नान्हे याचे हस्ते करण्यात येणार आहे. सकाळी 10 ते सायं 5 वाजेपर्यंत छत्तीसगड येथील राऊत नाच याचं सडक अर्जुनी शहरात रोड शो, दुपारी 1 वाजता दंडार महोत्सव कार्यक्रमाचे उद्घाटन कॉन्ट्रॅक्टर वसंत लांजेवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. दंडार स्पर्धेतील प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या दंडार मंडळाला प्रथम पारितोषिक 7001 रुपये रोख व शील्ड, द्वितीय पारितोषिक 5001 रुपये रोख व शील्ड, तृतीय पारितोषिक 3001 रुपये रोख व शील्ड, देण्यात येणार आहे. शहरातील गरजू महिलांना नवयुवक मंडई मंडळाच्या वतीने आनंदाचा शिधावाटप व स्थानिक जि.प. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. तर रात्री 9 वाजता स्थानिक जि. प. हायस्कूलच्या प्रांगणात मराठमोळी लावणी, कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सदर कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार तथा माजी मंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते, नगराध्यक्ष तेजराम मडावी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डॉ. सुगत चंद्रिकापुरे, संस्थापक डॉ.अजय लांजेवार , जि .प .सदस्य चंद्रकला डोंगरवार, प.स .सदस्य अल्लाउद्दीन राजानी, पोलीस निरीक्षक मंगेश काळे , तालुका अध्यक्ष डॉ.अविनाश काशीवार, तालुकाध्यक्ष मधुसूदन दोनोडे, तालुका अध्यक्ष लक्ष्मीकांत धान गाये, न प उपाध्यक्ष वंदना डोंगरवार, न. प. उपाध्यक्ष वंदना डोंगरवार , न.प.सभापती असलेश अंबादे, गोपीचंद खेडकर, दीक्षा भगत,पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल मुनिश्वर,सेवानिवृत्त प्राचार्य राजकुमार हेडाऊ, दिनेश पंचभाई, विदेश टेंभुर्णे, शेषराव गिरेपुंजे, राजूभाऊ पटले, राजेश कठाने, दिनेश हुकरे , किशोर डोंगरवार, निशांत राऊत ,हितेश डोंगरे, नगरपंचायतीचे सर्व नगरसेवक, सर्व पत्रकार बंधू, यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहतील. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष नसीम शेख, नौशाद सय्यद, उपाध्यक्ष दिलीप कुलभजे ,बाळकृष्ण शहारे, सिद्धार्थअंबादे, संजू भाऊ जगताप, दिग्रेश टेंभुरकर, अनिकेत कापसे, नितेश कोरे किशोर झिंगरे, संदेश शहारे संजय झाडे, संतोष टेंभुर्णी, बिरला गणवीर, अशोक टेंभुर्णे, विलास फुलुके, विलास शहारे,शंकर गुडीमेश्राम ,राकेश शहारे, तसेच मंडळाचे इतर पदाधिकाऱ्यांनी केले आहे.