अटल क्रीडा महोत्सव

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सडक अर्जुनी दि-20/12/2024 ला जि. प.हाय.व कनिष्ठ महाविद्यालय सडक अर्जुनी येथे ‘अटल क्रीडा महोत्सव केंद्र सडक अर्जुनी’ बक्षीस वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष सुभाष बागडे ग.शि.अ. प.स.सडक अर्जुनी मा. अल्लाउदीन राजानी प स. सदस्य सडक अर्जुनी मा. जी जे कापगते ललिताताई डोंगरवार, मुकतेश्वरी गायकवाड,चंद्रशेखर शहारे,ममताताई शहारे प्राचार्य एन के गजभिये होत्या.प्रमुख उपस्थिती मध्ये सडक अर्जुनी केंद्रातील सर्व मुख्याध्यापक व शिक्षक शिक्षिका डी पी डोंगरवार,पी सी येळेकर, आर जी पुस्तोडे, सी.एम.भिवगडे,वाय वाय मौदेकर,सौ आय वाय रहांगडाले,संग्रामे मॅडम, डोंगरे मॅडम, सूर्यवंशी मॅडम, हुकरे मॅडम,चौधरी मॅडम, नंदेश्वर मॅडम,श्री आर जी निंबेकर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष व उपस्थित मान्यवर यांनी ‘मा. अटल बिहारी वाजपेयी,शारदा माता, सावित्रीबाई फुले’यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले व कार्यक्रमाची सुरवात केली. या कार्यक्रमामध्ये एकल,सामूहिक क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये उत्कृष्ट कामगिरीसाठी पदक पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन व आभार नेमीचांद गिऱ्हेपुंजे यांनी मानले,कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले.

AGM News24
Author: AGM News24

Leave a Comment

और पढ़ें

  • Buzz Open / Ai Website / Ai Tool