सडक अर्जुनी – सौंदड येथील लोहिया शिक्षण संस्था द्वारा संचालित रामेश्र्वरदास जमनादास लोहिया माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय,रामदेवबाबा अध्यापक विद्यालय व जमुनादेवी लोहिया प्राथमिक शाळा, सौंदड यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 20 डिसेंबर 2024 रोज शुक्रवारला विद्यालयात संस्थापक- संस्थाध्यक्ष मा.जगदीश लोहिया यांच्या प्रेरणेने, विद्यालयाच्या प्राचार्या मा. उमा बाच्छल यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रसंत गाडगे महाराज स्मृतिदिन कार्यक्रम साजरा करण्यात आला.
यावेळी प्राचार्य , मा.गुलाबचंद चिखलोंडे , मुख्याध्यापक मा. मनोज शिंदे , पर्यवेक्षक मा. डी .एस .टेंभुर्णे , प्राध्यापक मा .आर. एन. अग्रवाल,जि. एस. कावळे,स . शि. सौ के .एस .काळे, स. शि. श्री .टी बी. सातकर आदी उपस्थित होते .
कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख अतिथींनी राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले.
समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजूती, अनिष्ट, रुढ़ी -परंपरा दूर करण्यासाठी ज्यानी आपले पूर्ण आयुष्य वेचले अश्या संत गाडगे महाराज यांच्या जीवनाविषयी वर्ग ९वी ची अनन्या विठ्ठले या विद्यार्थिनीने माहिती सांगितली .
कार्यक्रमाला विद्यालयातील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन कु . यू. बी डोये यांनी केले तर आभार स. शिक्षिका जि. यु. राहागडाले यांनी मानले.