सडक/अर्जुनी तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये घर वापसी

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सडक अर्जुनी(अनिल मुनिश्र्वर):-

तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय, रेलटोली गोंदिया येथे माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या हस्ते दुपट्टा वापरून घर वापसी केली. माजी सरपंच दिनेश कोरे यांची काही दिवसापूर्वीच पक्षात घर वापसी झाली. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीतील प्रचंड यशानंतर खासदार श्री प्रफुल पटेलजी यांच्या कार्यक्षम व खंबीर नेतृत्वात क्षेत्राचा सर्वांगीण विकास व प्रगती होणार यावर विश्वास ठेवून यावेळी सडक/अर्जुनी तालुक्यातील श्री घनश्याम गजभिये, श्री सचिन यसनसुरे, श्री भुवन भोयर, श्री उमराव मांढरे, श्री नीतेश खोटेले, श्री सचिन जयराम, श्री गुलाब तोड़फोड़े, श्री नीरज मेश्राम, श्री नेतराम ब्राम्हणकर, श्री सुनील रहिले, श्री गुड्डू मरस्कोल्हे, श्री महेंद्र हेमने, श्री माणिक वाढई, श्री किशन अम्बुले, श्री संतोष लामकासे, श्री राजेश कठाने, श्री खेमचंद खोटेले, श्री नीलेश ब्राम्हणकर, श्री राजेश राहंगडाले, श्री चोपराम भालेकर, श्री उमराव मांढरे, श्री विनोद काम्बले, श्री श्यामराव कळोन्हवे, श्री पतिराम मंढारी, श्री कृष्ना दलाल, श्री घनश्याम कापगते, उज्वलाताई हटवार, श्री माधो हटवार, श्री मनीष मुनेश्वर, श्री अंकुश गजभिए, श्री भुवन भोयर, श्री शेषराव मेश्राम, श्री नीलेश ठलाल, श्री प्रमोद लांजेवार, श्री सुनील चाफले, श्री नरेश साखरे, श्री राहुल मोटूले, श्री सुरेश तुमदाम, श्री प्रदीप काम्बले, श्री होमराज दखने, श्री अजय ठलाल सह अनेक कार्यकर्त्यांनी घर वापसी केली या घर वापसीमुळे पक्षाला बळकटी येणार असून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

यावेळी सर्वश्री मा.आमदार राजेन्द्र जैन, अशोक सहारे, दिनेश कोरे, राजू एन जैन, केतन तुरकर, किशोर तरोने, डी यू राहंगडाले, अखिलेश सेठ, रवी पटले, नीरज उपवंशी, शैलेश वासनिक व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

AGM News24
Author: AGM News24

Leave a Comment

और पढ़ें

  • Buzz Open / Ai Website / Ai Tool