सडक अर्जुनी
तालुक्यातील वडेगाव या गावात राष्ट्रवादीचे आ.इंजि. राजकुमार बडोले यांना सडक अर्जुनी तालुक्यात सर्वाधिक म्हणजे 899 मते घेऊन 744 मतांची आघाडी मिळवून देण्यात 111 चे बुथ प्रमुख मंगेश पुंडलिक मुनीश्वर तर 112 चे बूथ प्रमुख भावेश दौलत मुनिश्र्वर यांचा सिंहाचा वाटा आहे.या दोन्ही भाजपाच्या कट्टर कार्यकर्त्यांनी अहोरात्र परिश्रम करून गावातील मतदारांना प्रभावित करून महायुतीचे उमेदवार इंजि.राजकुमार बडोले यांना आघाडी मिळवून दिली. 111 क्रमांकाच्या बुथवर 851 मता पैकी राष्ट्रवादीचे इंजि. राजकुमार बडोले यांना 553 अपक्ष डॉ.सुगत चंद्रिकापुरे यांना 159 तर काँग्रेसचे दिलीप बनसोड यांना शंभर मते तर बुथ क्रमांक 112 वर 498 मता पैकी 343 राष्ट्रवादीचे इंजि.राजकुमार बडोले यांना डॉ.सुगत चंद्रिकापुरे यांना 60 तर काँग्रेसचे दिलीप बनसोड यांना 55 मते मिळाली असे एकूण दोन्ही बुथवर राष्ट्रवादीचे राजकुमार बडोले यांना 899 मध्ये मते मिळाली असून सडक अर्जुनी तालुक्यात वडेगाव येथील दोन्ही बूथांवर 744 मतांची आघाडी आहे.
मागील काही वर्षात वडेगावचा पाहिजे तसा विकास झालेला नाही तरीपण आ. इंजि.राजकुमार बडोले यांनी विशेषत्वाने लक्ष देऊन या गावाचा विकास करावा अशी अपेक्षा गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे…