सडक अर्जुनी(अनिल मुनिश्र्वर):-
तालुक्यातील आदिवासी विकास हायस्कूल व कला, विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालय, खजरी/ डोंगरगाव येथे वर्ग 8 वी च्या विद्यार्थिनींनी “KBC : कोण बनेल प्रश्नमंजुषा चॅम्पियन” या स्पर्धेचे होस्टिंग केले.
सर्वप्रथम कु. केशर गोबाडे व कु. हिमांशी लंजे या मुलींनी स्पर्धेसाठी वर्ग 7 वी च्या इच्छुक विद्यार्थ्यांचे गट तयार केले, गटांना अभ्यासक्रम सांगितला, प्रश्न तयार केले, श्री. ए. डी. मेश्राम तंत्रस्नेही शिक्षक यांनी ppt द्वारे KBC प्रश्नमंजुषा तयार केली. आणि शेवटी ही स्पर्धा शुक्रवारला सामूहिक शारदा पूजनदरम्यान प्रोजेक्टरवर एका मुलीने होस्टिंग केले तर एका मुलीने कॅम्पुटर ऑपरेट केले. यात विजेत्या गटांना बक्षीस देण्यात आले. सदर मुलींचे प्राचार्य श्री. डी. डी. रहांगडाले व सर्व शिक्षकांनी कौतुक केले.