सडक अर्जुनीचा पुत्र होणार गोंदिया जि.प.च्या सामान्य प्रशासन विभागाचा डेप्युटी सीईओ.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

गोंदिया,दि.०२: गोंदिया जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी या रिक्त पदावर चंद्रपूर जिल्हा परिषदेतील मग्रारोहयोचे जिल्हा कार्यक्रम समन्वयक फरेंद्र आर.कुतीरकर यांची नियुक्ती राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने २६ नोव्हेंबरला केली आहे.विशेष म्हणजे कुतीरकर हे मूळचे गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील जांभळी येथील रहिवासी आहेत.

गडचिरोली जिल्हा परिषदेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर कार्यरत असताना सन २०१८- १९ या वर्षाकरिता गुणवंत अधिकारी म्हणून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले होते.कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ते ओळखले जातात.२००९ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करीत सेवेत रुजू झाले.

AGM News24
Author: AGM News24

Leave a Comment

और पढ़ें

  • Buzz Open / Ai Website / Ai Tool