गोंदिया(अनिल गो.मुनिश्र्वर):-
अर्जुनी/मोरगाव विधानसभा क्षेत्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ग्राम बबई ता. गोरेगांव येथे श्री सोमेश रहांगडाले यांच्या निवास स्थानी गोरेगांव तालुक्याच्या वतीने माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली. यावेळी माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
महायुतीचा हा विजय आमच्या सर्व घटक पक्षाच्या एकजुटीचा व समन्वयाचा आहे. पुढील काळात एकत्र महायुती धर्माचे पालन करीत राहिलो तर कोणतीही निवडणुक जड जाणार नाही. महायुतीच्या उमेदवारांना निवडूण आणण्यात अहोरात्र मेहनत करून विजयश्री खेचून आणल्याबद्दल सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्याचे मनापासून अभिनंदन तसेच महायुतीला साथ द्या खा.श्री प्रफुल पटेलजी यांनी केलेल्या या आवाहनाला आपण सर्वांनी विश्वास ठेवून उमेदवारांना विजयी बनविले आहे. त्याबाबत जबाबदार व्यक्ती या नात्यानं जनसेवेस सदैव कटिबद्ध राहू. तसंच आगामी काळात या क्षेत्राला, विकासाच्या प्रगती पथावर पुढे घेऊन जाण्याचा निर्धार व्यक्त केला. संघटन बांधणी ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. पक्ष मजबुतीसाठी कार्यकर्ताच्या समस्या जाणून घेत त्या सोडविण्यावर भर द्यावा व पक्ष संघटन बांधणी करावी असे प्रतिपादन माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांनी केले.
बैठकीला सर्वश्री राजेंद्र जैन, केतन तुरकर, केवलभाऊ बघेले, सोमेश रहांगडाले, सुरेंद्र रहांगडाले, रामभाऊ हरिणखेडे, वांशिला उईके, अनिता तुरकर, श्रद्धा रहांगडाले, भूपेश गौतम, देवचंद सोनवाणे, लालचंद चव्हाण, चौकलाल येळे, राजकुमार बाबा बोपचे, डॉ. श्याम फाये, गौतमजी, कोल्हे जी, बाबाभाऊ बिसेन, दीपक बोपचे, श्रीकृष्ण गलोले, धनू मेंढे, राजेश बिसेन, बाबा बघेले, अतू मोटघरे, हेतराम रहांगडाले, रतिराम मेश्राम, दिनेश बघेले, नीलाराम डहारे, विजय कुर्वे, योगेंद्र उईके, हरीचंद चौधरी, उमेश बिसेन सहित मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.