जनतेने विकासकामे बघून मला निवडून दिले-आ.विजय रंहांगडाले

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

गोंदिया (अनिल गो.मुनिश्र्वर):-

तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्रात विजय रहांगडाले यांची तीस-यांदा आमदारपदी निवड झालेली असून यामध्ये प्रचंड मताधिक्याने जनतेनी पसंती दिलेली आहे निवडनुक कालावधीमध्ये विरोधकांकडून तिस-यांदा आमदार पदी निवड करण्याबाबत विरोध केला होता तसेच राजकारणामध्ये राजकीय विरोध न करता त्याच्या वैयक्तिक घटनेचा संबध लावला होता त्याचा कुठलाही परिणाम मतदारांवर झालेला नाही विजय रहांगडाले हे २०१४ पासून तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे प्रतीनिधित्व करीत असून त्यांनी २०१४ ते २०१९ या कालावधीत धापेवाडा उपसा सिंचन टप्पा क्र. १ चे पाणी २२ कि.मी.पाईपलाईनद्वारे खैरबंदा जलाशयात सोडून काम पूर्णत्वास नेले तसेच २०१९ ते २०२४ या कालावधीत टप्पा क्र. २ चे पाणी बोदलकसा व चोरखमारा तलावात पाणी सोडण्याकरीता त्यांना यश प्राप्त झाले या योजनेचा लाभ लाभक्षेत्रातील सर्व शेतक-यांना मिळावा याकरिता नहराच्या संपूर्ण दुरुस्तीकरिता २०० कोटी रुपयाचा निधी मंजूर करवून कामाला सुरुवातसुद्धा केली आहे एवढेच नव्हे तर या धापेवाडा उपसा सिंचन योजनेचा लाभ विधानसभा क्षेत्रात गोरेगाव तालुक्यातील शेतक-यांना मिळावा याकरिता टप्पा २ चरण ३ करिता सुमारे ५२१७ कोटी रुपयाची प्रशासकीय मान्यता शासनाकडून प्राप्त करवून कामाचे भूमिपूजनसुद्धा करवून घेतले आहे विजय रहांगडाले यांची कारकीर्द बघता विधानसभा क्षेत्रात त्यांनी पंचायत समिती ते २ वेळा विधानसभा सदस्य पर्यंत त्यांनी सतत जनतेच्या समस्या मार्गी लावण्याकरिता सतत अग्रेसर राहिले आहेत त्यांनी विधानसभा क्षेत्रात रोड, रस्ते, आरोग्यविषयक सुविधा व पूल बांधकाम याकरिता भरीव निधी शासनाकडून खेचून आणला आहे व त्यांचे सिंचनविषयक सोयी उपलब्ध करण्याकरिता विशेष योगदान आहे या सोबतच सन १९९५ पासून प्रलंबित असलेला निमगाव आंबेनाला प्रकल्प जवळपास मार्गी लावला असून याकरितासुधा सुधारित प्रशासकीय मान्यता प्राप्त झालेली आहे या सर्व बाबींचा विचार करून विकासाकडे वाटचाल बघता तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्रातील जनतेनी २०२४ मध्ये प्रचंड मताधीक्यानी निवडून दिल्याबद्दल आमदार महोदयांनी मतदारांचे आभार मानले असून यापुढेही रोड रस्ते व आरोग्य, शिक्षण याबरोबर सिंचन प्रकल्पावर विशेष भर देऊन, जलाशयाची दुरुस्ती करून शेतक-यांना सक्षम बनविण्याची ग्वाही दिलेली आहे.

AGM News24
Author: AGM News24

Leave a Comment

और पढ़ें

  • Buzz Open / Ai Website / Ai Tool