सौंदड येथील लोहिया शिक्षण संस्था द्वारा संचालित रामेश्वरदास जमनादास लोहिया माध्य . व उच्च माध्य.विद्यालय, सौंदड च्या एन जी. रामटेके ह्या नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्या .त्यांचा सेवानिवृत्ती सत्कार समारंभ शनिवार दि. 30 नोव्हेंबर 2024 ला सकाळी 11.30 वाजता मा.जगदीश लोहिया, संस्थापक – संस्थाध्यक्ष, लो . शि.संस्था, सौंदड यांच्या अध्यक्षतेखाली,मा . आ.न.घाटबांधे ,संस्था उपाध्यक्ष,लो. शि . संस्था ,मा .पंकज लोहिया सचिव लो. शि संस्था , माननीय मधुसूदन अग्रवाल सहसचिव लो. शि. संस्था , मा. हरीश अग्रवाल संस्था सदस्य , मा. अनिलजी दीक्षित पोलीस पाटील कोहमारा, मा.प्रल्हादजी कोरे, मा.पुरुषोत्तम भिवगडे , मा.पठाण साहेब ,प्राचार्य मा .उमा बाच्छल ,मा.गुलाबचंद चिखलोंडे,मुख्याध्यापक मा.मनोज शिंदे, पर्यवेक्षक मा.डी.एस. टेंभुर्णे ,प्राध्यापक मा.आर.एन.अग्रवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदय तसेच प्रमुख अतिथिंच्या शुभहस्ते लोहिया शिक्षण संस्था व कर्मचाऱ्यांच्या वतीने शाल , श्रीफळ व भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष ,प्रमुख अतिथी व शिक्षकांनी सेवानिवृत्त एन.जी. रामटेके यांच्या स्वभावगुण ,कामांचे योग्य नियोजन, शाळेप्रती आस्था,योग्य कार्यपद्धती ई.गुणांची प्रसंशा केली. कार्यक्रमाला लोहिया शिक्षण संस्थेच्या सर्व कार्यकारिणीचे पदाधिकारी व सदस्य गण,निमंत्रित पाहुणे,पालक ,गावकरी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन कू.यू.बी. डोये , स. शि.यांनी केले तर आभार प्रा.जी. एस.कावळे यांनी मानले.