Search
Close this search box.

अनुकंपावर लागलेल्या स्मिताचा बस अपघातात मृत्यू, बाळ झालं पोरकं

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

AGM NEWS24 (अनिल मुनिश्र्वर) गोंदिया – अर्जुनी मोरगाव, दि.29 : कोहमारा – गोंदिया मार्गावर डव्वा – खजरी गावाजवळ आज २९ नोव्हेबंरला झालेल्या शिवशाही एस.टी.बसच्या भिषण अपघातात ११ प्रवासी ठार व २९ प्रवाशी जखमी झाल्याची घटना दुपारी १ वाजेच्या दरम्यान घडली.यात मृतकांमधे अर्जुनी मोर.येथील रहिवासी स्मिता सुर्यवंन्सी या पोलीस शिपाई महिलेचा समावेश असुन अर्जुनी मोर.तालुक्यातील चार जण किरकोळ जखमी झाले.तालुक्यातील मोरगाव येथील रहिवासी असलेली स्मिता विक्की सुर्यवंशी,वय-32 ही आज सकाळीच अर्जुनी मोरगाव वरुन बसने साकोली करीता निघाली.साकोलीवरुन गोंदिया येथील पोलीस मुख्यालयात नौकरीवर हजर होण्याकरीता ती भंडारा गोंदिया या शिवसाही बसने प्रवास करायला निघाली.मात्र आपला हा प्रवास अखेरचा ठरेल असे तिला कधीही वाटले नसेल.पतीच्या निधनांनंतर पोलीस विभागात अनुकंपावर नोकरीला लागलेल्या स्मिताला १ मुलगा असून ती पतीच्या निधनानंतर सासु सासर्यासोंबतच राहत होती.या बस अपघातात मृत्यू पावलेली स्मिता सुर्यवंन्सीचे पती पोलीस विभागातच कार्यरत होते.त्यांचे यापूर्वीच आजाराने निधन झाले होते.त्यामुळे स्मिता सुर्यवन्सीवर मोठा आघात झाला होता.आपले सासु सासरे व एका छोट्याशा बाळासह हलाखीचे जिवन जगत असताना स्मिताला पोलीस मुख्यालय गोंदिया येथे पोलीस शिपाई म्हणून अनुकंपा तत्वावर दोन तिन महिण्यापुर्वीच नोकरी मिळाली होती.आपले परिवारांना भेटुन स्मिता आज 29 नोव्हेंबरला आपल्या नोकरीवर जाण्यासाठी अर्जुनी मोर वरुन निघाली होती.तिच्या या अनाकलनीय मृत्यूने कुटुबियांवर शोककळा पसरली असून लहान मुल हे आईवडींला विना पोरकं झाले आहे.तालुक्यातील ईंजोरी येथील शंकर देवाजी हुकरे,रामकला शंकर हुकरे,बोंडगांवदेवी येथील राहुल मधुकर कांबळे,सोमलपुर येथील टिना यशवंत दिघोरे हे किरकोळ जखमी झाल्याची माहीती आहे.

AGM News24
Author: AGM News24

Leave a Comment

और पढ़ें

  • Buzz Open / Ai Website / Ai Tool