गोंदिया(अनिल गो.मुनिश्र्वर):-
उप जिल्हा कार्यक्रम समन्वयक ( मग्रारोहयो ) चंद्रपुर येथून शासन आदेशानुसार गोंदिया जिल्हा परिषद मध्ये सामान्य प्रशासन विभाग रिक्त पदी उप मुख्य कार्यकारी अधिकारी फरेंद कुतिरकर यांची बदली करण्यात आली आहे .
विशेष म्हणजे गडचिरोली जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कार्यरत असताना सन २०१८-१९ या वर्षाकरिता गुणवंत अधिकारी म्हणून राज्यपाल भगत कोश्यारी यांच्या हस्ते गौरविण्यात आले होते.कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जातात.ते मूळचे सडक अर्जुनी तालुक्यातील जांभळी/दोडके येथील असून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पास होऊन महाराष्ट्र विकास सेवा 2009 ला पास करून महाराष्ट्र विकास सेवेत रुजू झाले.