सडक अर्जुनी
नवजीवन शिक्षण संस्था राका द्वारा संचालित नवजीवन विद्यालय राका येथे आज दिनांक २६ नोव्हेंबर २०२४ रोज मंगळवारला ७५ वा संविधान दिन साजरा करण्यात आला याप्रसंगी मुख्यध्यापिका कु पद्मा चुटे यांच्या अध्यक्षतेखाली व समस्त कर्मचारी वृंद व विद्यालयातील विद्यार्थी यांच्या उपस्थित कार्यक्रम पार पडला.
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून, संविधान पुस्तिकेचे पूजण करून दीप प्रज्वलीत करण्यात आले, यनिमित्त संविधानाची प्रस्तविका वाचन करण्यात आली. विद्यार्थिनींनी रांगोळी रेखाटली, यावेळी उपस्थित कु. ज्ञानेश्वरी धनभाते, कु. युक्ती मेश्राम यांनी संविधान दिन निमित्त माहिती सांगितली.
तसेच श्री. महेंद्र दोनोडे यांनी संविधान दिन व २६ नोव्हेंबर २००८ ला मुंबई येथे झालेल्या हल्ला याबद्दल सविस्तर माहिती दिली,
शेवटी २६ नोव्हेंबर २००८ ला मुंबई येथे झालेल्या हल्यातील साहिदांना श्रद्धांजली म्हणून दोन मिनिटाचे मौन पाळण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन कु. ख़ुशी लंजे हिने तर आभार कु. याश्री मेश्राम हिने केले.