सडक अर्जुनी
भारतीय संविधान दिवस २६ नोव्हेंबर रोजी तालुका काँग्रेस कार्यालय सडक अर्जुनी येथे जिल्हाध्यक्ष दिलीप भाऊ बनसोड माजी आमदार यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला.
सर्व प्रथम भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्राला दिलीप भाऊ बनसोड यांचे हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी जेष्ठ कांग्रेस कार्यकर्ते तथा माजी जी प सदस्य गंगाधर परशुरामकर, तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष मधुसूदन दोनोडे, प्रदेश प्रतिनिधी दामोदर नेवारे,शहर अध्यक्ष विरेंद्र गौर, जिल्हा उपाध्यक्ष रोशन बडोले, तालुका सेवा दल अध्यक्ष संतोष लाडे, शिवसेना नेते राजू भाऊ पटले, महेश डुंबरे, दिनेश हुकरे,पं स सदस्य डॉ रुकिराम वाढई,तालुका कृषी सेल अध्यक्ष आसटकर, धनवंता गभणे, गायत्री ईरले, सामाजिक कार्यकर्ते अनिल मेश्राम,युवक काँग्रेसचे निशांत राऊत, अशोक मेश्राम, संघटक किशोर शेंडे, स्वप्निल ब्राम्हणकर, नगरसेवक अंकित भेंडारकर,रेहान शेख, सुधाकर कुर्वे, कांग्रेसचे जेष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते
संविधान दिवस निमित्त अनेक मान्यवर यांनी मनोगत व्यक्त केले. मधुसूदन दोनोडे,श्री गंगाधर परशुरामकर, राजु भाऊ पटले यांनी संविधान दिवसाचे महत्त्व समजावून सांगितले तसेच विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे बरेच उमेदवार यांची हार झाली याबाबत कारणमीमांसा करताना झालेल्या चुकांची दुरुस्ती करावी,खचुन न जाता या पुढे एकजुटीने काम करुन पक्ष संघटन बळकट करण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केले.
अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस उमेदवार दिलीप भाऊ बनसोड यांचा झालेला पराभव या बाबत साधकबाधक चर्चा घडवून आणली.
मा दिलीप भाऊ बनसोड जिल्हाध्यक्ष यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सर्वप्रथम निवडणुकीत केलेल्या सहकार्याबद्दल सर्वांचे आभार मानले. संविधान दिवस निमित्ताने संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालून लोकशाही मुल्ये जतन करणे महत्त्वाचे आहे,तसेच संविधान टिकवणे सर्व नागरिकांचे कर्तव्य आहे. धर्मनिरपेक्षता आणि एकात्मता जोपासणारा कांग्रेस पक्ष आहे तरीही आपण हार न मानता एकजुटीने पक्ष बळकट करण्यासाठी मेहनत करावे, सामान्य नागरिक यांच्या समस्या अडीअडचणी सोडविण्यासाठी आपण सदैव तत्पर आहोत असेही सांगितले. यापुढेही आपला लढा संघर्ष चालू राहील या साठी सर्व कार्यकर्ते यांनी सहकार्य करावे असे आवाहन केले
संचालन दामोदर नेवारे यांनी केले तर आभार निशांत राऊत यांनी मानले