सडक अर्जुनी
26/11/2024 ला जि. प.हाय.व कनिष्ठ महाविद्यालय सडक अर्जुनी येथे ‘संविधान दिन ‘ साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष प्राचार्य नंदा गजभिये होत्या.प्रमुख उपस्थिती मध्ये सडक अर्जुनी चे गटशिक्षणाधिकारी सुभाष बागडे,डी पी डोंगरवार,पी सी येळेकर, आर जी पुस्तोडे,चरण भिवगडे, नेमीचंद गिऱ्हेपुंजे,वाय वाय मौदेकर,सौ आय वाय रहांगडाले,संग्रामे मॅडम, डोंगरे मॅडम, सूर्यवंशी मॅडम, हुकरे मॅडम,चौधरी मॅडम, नंदेश्वर मॅडम,श्री आर जी निंबेकर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष व उपस्थित मान्यवर यांनी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संविधान प्रास्ताविका यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले व कार्यक्रमाची सुरवात केली. या कार्यक्रमामध्ये संविधान प्रास्ताविकाचे सामूहिक वाचन केले तसेच अध्यक्ष यांनी प्रास्ताविकातील मूलभूत कर्तव्य, अधिकार व जजाबादारी याविषयी माहिती दिली.
कार्यक्रमाचे संचालन व आभार व्ही.पी.आगासे यांनी मानले,कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले.