गोंदिया, दि.27 : दिनांक 26 नोव्हेंबर 2024 रोजी संविधान दिनानिमित्याने तसेच गोंदिया जिल्हयातील नक्षलग्रस्त प्रभावित भागात नक्षल विरोधी अभियान राबवित असताना नक्षली हल्ल्यात शहीद झालेले गोंदिया जिल्हा पोलीस दलातील पोलीस अधिकारी- पोलीस अंमलदार त्याचप्रमाणे मुंबई शहर येथे आंतकी हल्ल्यात शहीद झालेले पोलीस अधिकारी- अंमलदार, निष्पाप नागरिक यांच्या स्मृती- प्रित्यर्थ लोक- कल्याण कार्यास सहकार्य व्हावे याकरिता पोलीस अधीक्षक गोंदिया मा. श्री. गोरख भामरे व अपर पोलीस अधीक्षक गोंदिया श्री. नित्यानंद झा, यांचे निर्देश मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी आमगाव श्री. प्रमोद मडामे, गोंदिया श्रीमती रोहिणी बानकर मॅडम, देवरी श्री. विवेक पाटील, तीरोडा श्री साहिल झरकर यांचे मार्गदर्शनात दिनांक – 26 नोव्हेंबर 2024 रोजी जिल्ह्यातील 7 प्रमुख ठिकाणी- जिल्हा वाहतुक शाखा गोंदिया, पोलीस उप-मुख्यालय देवरी, पो.स्टे. आमगाव, पो.स्टे. तिरोडा, पो.स्टे. सालेकसा, पो.स्टे. अर्जुनी/मोर, पो.स्टे. डुग्गीपार इत्यादि ठिकाणीं वेळ सकाळी 10.00 वाजता ते सायंकाळी 05.00 वाजता दरम्यान रक्तदान शिबिर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
मा. पोलीस अधीक्षक गोंदिया श्री. गोरख भामरे यांनी जिल्हा वाहतूक शाखेत आयोजित रक्तदान शिबिर कार्यक्रमास प्रामुख्याने उपस्थित राहून जिल्ह्यांतील विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिर कार्यक्रमाचे औपचारीक रित्या उद्घाटन केले. शिबिरात सहभागी गोंदिया जिल्हा पोलीस दलातील पोलीस अधिकारी- अंमलदार, तरुण- तरुणी, सामान्य नागरिक, प्रतिष्ठीत व्यक्ति यांनी जिल्ह्यांतील प्रमुख 7 ठिकाणीं आयोजित शिबीर कार्यक्रमात मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे सहभागी होत जिल्हा वाहतूक शाखा गोंदिया-39, पोलीस उप- मुख्यालय देवरी -78, पोलीस स्टेशन आमगाव-76, पोलीस स्टेशन अर्जुनी/मो.-44, पोलीस स्टेशन सालेकसा- 82, पोलीस स्टेशन तिरोडा- 34 ,पो.स्टे. डुग्गीपार – 71 अश्याप्रकारे जिल्ह्यातील एकुण – 424 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
लोक-कल्याण कार्याच्या पुण्यकार्यात मोठ्या संख्येने उत्स्फूर्त पणे सहभागी होत रक्तदान करणाऱ्या जिल्हा पोलीस दलातील पोलीस अधिकारी- अंमलदार त्याचप्रमाणे जिल्ह्यातील सामान्य नागरिक , युवक युवती, प्रतिष्ठित नागरिक यांना गोंदिया जिल्हा पोलीस दल एचडीएफसी बँक येथील उपस्थित वैद्यकीय चमू, डॉक्टर यांचे वतीने रक्तदान प्रमाणपत्र देण्यात येऊन गौरविण्यात आले आहे. तसेच आणखी काही जण रक्तदान करण्यास इच्छुक असताना त्यांचे हिमोग्लोबिन कमी, बी. पी.चा त्रास किंवा शरीरातील इतर आजार/विकार या कारणामुळे रक्तदान करू शकले नाही.
गोंदिया जिल्ह्यात विविध 7 ठिकाणी जिल्हा पोलीस दलातील पोलीस अधिकारी अंमलदार यांचे अथक परिश्रमातून शिबिर कार्यक्रमाचे उत्कृष्टरित्या आयोजन करण्यात आले.. विशेष सहकार्य एच. डी. एफ. सी. बँक गोंदिया येथील क्लसटर हेड श्री. दिपक पाटील, ब्रांच आपरेशन मॅनेजर श्री सुमित करमनकर, डॉ. पल्लवी चौरागडे, लोकमान्य ब्लड सेंटर गोंदिया येथील चेतन चव्हाण (टेक्निसियन सुपरवाईझर), रंजना मेश्राम (नर्स), खुशबू चांदेकर (नर्स), पल्लवी पटले (टेक्निसियन), सचिन सावरकर (टेक्निसियन) रोहित बागडे (टेक्निसियन) यांनी परिश्रम घेतले.
गोंदिया जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने पोलीस अधीक्षक गोंदिया श्री. गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. नित्यानंद झा, यांनी रक्तदान करणाऱ्या तसेच रक्तदान शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्या साठी अथक परिश्रम मेहनत घेवून सहकार्य करणाऱ्या सर्व पोलीस अधिकारी- अंमलदार त्याचप्रमाणे लोककल्याण कार्यास सहकार्य करण्याऱ्या सर्वांचे आभार मानलेत..