सडक अर्जुनी: (अरविंद मेंढे) – राका ते सौंदड रस्ता हा येथील वाळू व्यवसायिकांचा महत्त्वाचा मार्ग झाला आहे. या रस्त्यावर असलेल्या चुलबंद नदीच्या फुलावर आणि रस्त्यावर ठिकठिकाणी वाळू सांडल्यामुळे नागरिकांच्या अडचणीत भर पडली आहे. रस्त्यावर वाळू आणि वाहनांची वर्दळ यामुळे रस्ता निसरडा झाला आहे. यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे.
चुलबंद नदीपात्रातून वाळू मोठ्या प्रमाणात ट्रक व्दारे ओव्हर लोड वाळूची वाहतूक करण्यात येत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाळू रस्त्यावर सांडत असून या सांडलेल्या वाळूमुळे छोट्या-मोठ्या वाहनांना मोठ्या प्रमाणात अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.