गोंदिया, अनिल गो. मुनिश्वर (मुख्य संपादक) – आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गोंदियाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस भवन रेलटोली कार्यालय येथे २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात अतिरेक्यांविरोधात शहीद झालेल्या शुरवीर पोलिस अधिकारी व जवानांनी प्राणपणाने लढा देत आपल्या प्राणांचे बलिदान दिले. सर्व वीर जवानांना आणि मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना माजी आमदार श्री राजेंद्र जैन व पक्ष पदाधिकारी यांच्या वतीने श्रध्दांजली दिली व त्यांच्या स्मृतींना अभिवादन केलं.