AGM NEWS24 (अनिल मुनिश्र्वर) – विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला.राज्यात महायुतीने घवघवीत यश मिळवीले आहे. गोंदिया जिल्ह्य़ात अर्जुनी मोरगाव तिरोडा,आमगाव/देवरी व गोंदिया या चारही विधानसभा क्षेत्रात महायुतीचे आमदार निवडुन आले.मंत्रीमंडळ स्थापनेच्या हालचाली वेगाने सुरु झालेल्या आहेत.अशात गोंदिया जिल्ह्याला मंत्रीपद मिळण्याच्या आशा आहेतच.मात्र कुणाला मंत्रीपद द्यायचे याची जबाबदारी खा. प्रफुल पटेल यांच्याकडे असल्याने,चिन्ह आमचे, उमेदवार तुमचा(भाजपचा)या फार्मूल्याने निवडून आलेले प्रफुल भाईंच्या मर्जीतील राष्ट्रवादीचे एकमेव आमदार इंजि.राजकुमार बडोले यांनाच मंत्रिपद मिळणार असल्याची खात्रीलायक चर्चा आहे.
गोंदिया जिल्ह्यात चार विधानसभा क्षेत्र आहेत.चार पैकी गोंदिया,तिरोडा, व आमगाव/देवरी हे तिन विधानसभा क्षेत्र महायुतीमधुन भाजपाने लढविले.तर शेवटच्या घटकांपर्यंत अर्जुनी मोर. विधानसभेचा तिढा सुटला नव्हता.अखेर उमेदवार तुमचा चिन्ह आमचा या धर्तीवर भाजपाचे जेष्ठ नेते माजी मंत्री ईंजी.राजकुमार बडोले यांना ताबडतोब राष्ट्रवादी कांग्रेस मधे प्रवेश करवुन प्रफुल पटेल व महायुतीच्या नेत्यांनी बडोले यांना घडी निवडणुक चिन्हावर लढविले.गोंदिया जिल्ह्य़ात प्रफुल्ल पटेल यांचे नेतृत्वात महायुतीने चारही जागा जिंकुन इतिहास घडविला.त्यामुळे जिल्ह्यात प्रफुल्ल पटेल यांचे राजकीय वजन वाढले असून जिल्ह्यातील ही निवडणुक प्रफुल्ल पटेलांनी अत्यंत प्रतिष्ठेची केली होती.तर अर्जुनी मोर.विधानसभा क्षेत्र राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातुन लढविण्यात आल्याने भाईजींनी या क्षेत्रात आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती.आता चारही जागा महायुतीच्या निवडुन आल्याने गोदिया जिल्ह्यासाठी एक मंत्रीपद मिळणार अशी आशा जिल्हावासियांची आहे.त्यासाठी प्रफुल्ल पटेल हे आपल्या राजकीय वजनाचा फायदा घेत मंत्रीपद आणणार ह्या चर्चा सुरु झालेल्या आहेत.
गोंदिया जिल्ह्यात महायुतीचे चारही आमदार दमदार आहेत.गोंदिया विधानसभेचे भाजप आमदार विनोद अग्रवाल यांची लगातार दुसरी वेळ आहे.तर तिरोडा भाजपाचे आमदार विजय रंहागडाले यांची तिसरी वेळ आहे.आमगाव/देवरीचे भाजपाचे आमदार संजय पुराम यांचीही आमदार म्हणुन दुसरी वेळ आहे.तर अर्जुनी मोर. विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट महायुतीचे आमदार इंजी.राजकुमार बडोले यांची आमदारकीची तिसरी वेळ आहे.यापुर्वी आमदार बडोले यांनी 2014 ते 2019 पर्यंत महाराष्ट्राचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणुन यशस्वीरित्या काम केले आहे.आपल्या मंत्रीपदाच्या कार्यकाळात सामाजीक न्याय मंत्रालय काय असते हे बडोले साहेबांनी संपुर्ण महाराष्ट्रासह देशाला दाखवुन दिले आहे,तर गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणुन बडोले यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे.त्यामुळे मंत्रीपदाचा अनुभव बडोलेंच्या अंगी आहे.
प्रफुल्ल पटेल यांनी ही जागा प्रतिष्ठेची केली होती म्हणून अर्जुनी मोरगाव क्षेत्रात प्रफुल्लभाई पटेल,वर्षाबेन पटेल व राजेंद्र जैन यांनी गावोगावी सभा लावून विधानसभा क्षेत्र पिंजून काढला होता.
त्यांनी प्रत्येक सभेत मतदारांना राजकुमार बडोले यांना आमदार बनविण्यासाठी नाही तर, मंत्री बनविण्यासाठी मतदान करायचे आहे हे आवर्जुन सांगीतले होते, आणि ते सार्थकी झाले सुद्धा. वरुन जिल्ह्यात इंजिनीयर बडोलेंच्या रूपाने राष्ट्रवादीला एक आमदार मिळाल्याने प्रफुल्ल पटेल जाम खुश असुन त्यांनी आपल्या भाषणात राजकुमार बडोले हे अत्यंत शांत सुस्वभावी व संस्कारीत नेते असल्याची ग्वाही सुद्धा अर्जुनी मोरगाव मतदारसंघात दिली होती. त्यामुळे राजकुमार बडोले यांनाच प्रफुल पटेल मंत्री बनवतील अशी प्रत्येक मतदारांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.आपल्या गोंदिया जिल्ह्याला एक कॅबिनेट दर्जाचा मंत्री आणि पालकमंत्री मिळावा म्हणून प्रफुल पटेल आग्रही असल्याची माहिती आहे…