अर्जुनी मोरगाव दि. 13 नोव्हेंबर :- अर्जुनी मोरगाव या देशातील सरकारने आतापर्यंत आमच्या मताचा फायदा घेऊन आपली पोळी सेकून घेतली मात्र आता आम्हाला आमच्या पक्षाचा उमेदवार मिळाला असून आम्ही आमच्या पक्षाचा उमेदवार निवडून आणून स्वाभिमानाने जीवन जगणे शिकणार आहोत. यासाठी आम्ही आता या निवडणुकीत लढणार आहोत लढेंगे,जितेंगे,लढे हैं,जिते है…हा अनुभव आम्हाला असल्यामुळे सरकारने हे लक्षात ठेवायला पाहिजे,आदिवासी हा या देशाचा मालक असून चालाक सरकारला आता बदलविल्या शिवाय पर्याय नाही.त्यामुळे या चालाक सरकारला धडा शिकविण्यासाठी आपण सर्वांनी आता डॉ.सुगत चंद्रिकापुरे यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना प्रचंड बहुमताने विजय करण्यासाठीच ही लढाई आपल्याला लढायची आहे.असे प्रतिपादन गोंडवाना गोंड तंत्र पार्टीचे अध्यक्ष देवरावेन भलावी यांनी केले.ते
गोंडवाना गोंड तंत्र पार्टी व प्रहार जनशक्ती पक्ष तसेच परिवर्तन महासक्ती यांचे वतीने डॉ.सुगत मनोहर चंद्रिकापुरे यांचे निवडणूक प्रचारार्थ प्रसन्न सभागृह अर्जुनी मोरगाव येथे आज दि. 13 रोजी जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला मार्गदर्शन करताना ते बोलत होते.यावेळी डॉ.सुगत चंद्रिकापुरे यांनी आदिवासी समाजाला न्याय दिल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही. ही लढाई आपल्या अस्तित्वाची असून आपण सर्वांनी या लढाईत सहभागी होऊन प्रहार करण्यासाठी पुढे येऊन मला विजयी करावं असे आवाहन केलं. यावेळी मंचावर गोंडवाना गणतंत्र पार्टीचे अध्यक्ष देवरावेन भालावी छिंदवाडा, गोंडवाना गोंड तंत्र पार्टीचे प्रदेशाध्यक्ष हरीश उईके,आमदार मनोहर चंद्रिकापुरे, जिल्हाध्यक्ष भरत भाऊ मडावी, महिला जिल्हाध्यक्ष छायाताई टेकाम,प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेंद्र भांडारकर शुभांगी वाठवे, किरणभाऊ कोरे, संतोष धुर्वे ,मुरारी पंधरे,सुधाकर पंध रे,,अतुल मसराम , यशवांत धूरवे, रतिराम कवडो,अस्मिता कोकोडे, आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.सभेला हजारो चे संखेने आदिवासी समाज बांधव व नागरिक उपस्थित होते,संचालन उमराव मांढरे यांनी केले.