अर्जुनी मोरगाव – अर्जुनी मोरगाव प्रहार जनशक्ती पक्ष व गोंडवाना गणतंत्र पार्टी चे अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे अधिकृत उमेदवार डॉ.सुगत मनोहर चंद्रिकापुरे आपल्या हक्काचा माणूस यांच्या प्रचारार्थ आज ता. 13 रोजी दुपारी 1 वाजता जाहीर सभेचे आयोजन गोवारी स्मारका जवळील पटांगण अर्जुनी मोरगाव येथे करण्यात आले आहे. या सभेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून गोंडवाना गणतंत्र पार्टीचे अध्यक्ष देवरावेन भलावी शिंदवाडा, तसेच गोंडवाना गणतंत्र पार्टीचे प्रदेशाध्यक्ष हरीश उईके हे राहणार आहेत. तरी या भव्य जाहीर सभेकरिता जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.